आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे : यजमान टीम इंडियाने शुक्रवारी पुण्याच्या मैदानावर उतरलेल्या श्रीलंका संघावर मालिका विजय मिळवला. भारताने आपल्या घरच्या मैदानावर तुफानी खेळीच्या बळावर श्रीलंकेचा पराभव केला. भारताने १५.५ षटकांत ७८ धावांनी विजयाची नाेंद केली. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-० ने आपल्या नावे केली. भारताने सलग दाेन सामने जिंकले. आता भारतीय संघ १४ जानेवारीपासून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताने टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये १६ व्यांदा २०० पेक्षा अधिक धावसंख्या नाेंदवली आहे. यात भारताने १२ वेळा विजयाची नाेंद करताना प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध वर्चस्व राखून ठेवले आहे.भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेला १२३ धावांवर राेखले. यामुळे श्रीलंकेच्या टीमला सलग दुसऱ्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय यामुळे टीमला ही मालिका ही गमावावी लागली. श्रीलंकेकडून डि सिल्वाने (५७) एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता आला नाही.
लाेकेश, धवनचे अर्धशतके
भारताकडून आता सलामीवीर लाेकेश राहुल (५४), शिखर धवन (५२) यांनी अर्धशतकी खेळी केली. तसेच मनीष पांडे (३२) आणि शार्दूल ठाकूर (२२) यांनी नाबाद खेळी करून संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावला.
कर्णधाराच्या भूमिकेत काेहलीच्या कमी डावांत वेगवान ११ हजार धावा
कर्णधार विराट काेहलीच्या नावे कर्णधाराच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसाेटी, वनडे, टी-२०) कमी डावात वेगवान ११ हजार धावांची नाेंद झाली. त्याने १९६ डावांत हा पल्ला गाठला. यासह त्याने पाँटिंगला (२५२ डाव) मागे टाकले आहे.
जसप्रीत बुमराहबद्दलची खेळाडूंच्या मनातील भीती दूर करणार : कर्णधार फिंच
मुंबई : टीम इंडियाच्या युवा गाेलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल आता टीमने फार जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण आमच्यासाठी भारतविरुद्धची वनडे मालिका अधिक महत्त्वाची आहे. याच मालिका विजयावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅराेन फिंचने आपल्या युवा खेळाडूंच्या मनातील बुमराहबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या १४ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. सलामीचा सामना मुंबईच्या मैदानावर रंगणार आहे. 'बुमराह हा निश्चितपणे गुणवंत गाेलंदाज आहे. मात्र आता मनातील भीती दूर करून त्याच्या गाेलंदाजीचा धाडसाने सामना करण्याची गरज असल्याचेही फिंचने यादरम्यान सर्वांना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.