आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहतांग खिंडीत अर्धा फूट हिमवर्षाव, मनाली-लेह हायवे बंद, रस्त्यांवर पर्यटकांची मौजमस्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुलू - हिमाचल प्रदेशमधील लाहोल स्पीती आणि कुलूला जोडणाऱ्या रोहतांग खिंडीत रविवारी हिमवर्षाव झाला. रस्त्यांवर जवळपास अर्धा फूट बर्फाचा थर साचला होता. यामुळे वाहनांचा वेग थांबला. बरालाच्या खिंडीत हिमवृष्टीमुळे मनाली महामार्गही बंद करण्यात आला होता.  दुसरीकडे, हनुमान टिब्बा, इंद्र किल्ला, चंद्रखानी, शिंकुला जोत, कुंजम पास, छोटा आणि बडा शिघारी ग्लेशियर, केलाँगची लेडी आणि नीलकंठ या टेकड्यांवर रात्री उशिरापर्यंत हिमवृष्टी सुरू होती. दरम्यान, पर्यटक वाहनांमधून खाली उतरून रस्त्यावर मौजमस्ती करताना दिसले. कुलूचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह म्हणाले- रोहतांग खिंडीत ६ इंच बर्फवृष्टी झाल्यामुळे वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...