आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च 2019 पर्यंत बंद होउ शकतात अर्ध्यापेक्षा जास्त ATM, नोटबंदी सारखी होउ शकते परिस्थिती..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात मार्च 2019 पर्यंत 50 टक्क्यांपेक्षा जास्त ATM होउ शकतात बंद. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMi) अनुसार देशात अंदाजे 2.38 लाख एटीएम आहेत, त्यापैकी 1.13 लाख एटीएम बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जर देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर एटीएम बंद झाले, तर लोकांना कॅश काढण्यात अडचणी येउ शकतात. त्यासोबतच लाखो लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे, कारण साधारणपणे एका एटीएममुळे दोन लोकांचा रोजगार चालतो. 
 

सरकारच्या डिझीटल इंडिया मोहिमेला लागू शकतो मोठा झटका.
एटीएम इंडस्ट्रीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, एटीएम बंद झाल्यानंतर पंतप्रधान जनधन योजनेच्या लाभार्थ्यांना सगळ्यात जास्त नुकसान होउ शकते. या योजनेच्या अंतर्गत खाते ओपन केलेल्या खातेधारकांना सब्सिडी, मनरेगाचे पैसे, विधवा पेंशन आणि इतर सरकारी मदत बँकेत येते. त्यासोबतच प्रत्येक खाते धारकाला डिझीटल इंडिया मोहिमेत जोडण्यासाठी एटीएम कार्ड दिले जाते. अशातच आता एटीएम बंद झाले तर, कॅशसाठी बँकेत लांबच लांब रांगा लागतील.
 

काय आहे एटीएम बंद होण्याचे कारण? 
एटीएम इंडस्ट्री कडून सांगण्यात आले आहे की, सध्या नियमांमध्ये खुप बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच एटीएमच्या हार्डवेअर आणि साफ्टवेअरला नवीन नोटानुसार अपडेट करावे लागले आहे. या सगळ्यांवर 3 हजार कोटींचा खर्ट येऊ शकतो त्यामुळे एटीएमची संख्या कमी होउ शकते.

 

यावर काय आहे उपाय?
एटीएम इंडस्ट्री कडून सांगितले की, यावर एक उपाय आहे तो म्हणजे बँकानी एटीएम अपडेशनचा खर्च उचलायला हवा. किंवा एटीएम बसवणाऱ्या कंपन्यांना थोडी सुट द्यावी. बँक कस्टमर्सना एटीएम सेवा उपलब्ध करण्यात कमी चार्ज मिळतो. त्यामुळे एटीएम कमी केले जाऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...