आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये १० वर्षे वयाच्या ५०% मुलांकडे स्वत:चा स्मार्टफाेन आहे. स्मार्टफाेन बाळगणाऱ्या ९ ते १० वर्षे वयाच्या मुलांची संख्या २०१९ मध्ये दुप्पट झाली आहे. ३ ते ४ वर्षांच्या २४ टक्के मुलांकडे टॅब्लेट आहे. यापैकी १५% मुलांनाच ही गॅजेट्स अंथरुणावर घेऊन जाण्याची परवानगी आहे. प्रसारमाध्यम नियामक आॅफकाॅमने द एज आॅफ डिजिटल इन्डिपेंडन्स शीर्षकाचा आपला वार्षिक अहवाल जारी केला. संस्था मुलांच्या माध्यम सवयी आणि काेणत्या प्रकारचे डिव्हाइस ते वापरतात यावर संशाेधन करत आहे. २०१९ चा हा अहवाल मुले आणि त्यांच्या पालकांसाेबत मिळून केला आहे. ऑफकॉम अहवालानुसार मुलांची पहिली आवड मोबाइल फोन आहे. सध्याची मुले इंटरनेटशिवाय जग ओळखत नाहीत. १० वयापुढील बहुतांश मुले सोशल मीडियाचा वापर करतात. सामाजिक कारणे आणि संस्थांप्रति आपला पाठिंबा व्यक्त करतात. १८% मुलांनी कोणती ना कोणती पोस्ट शेअर किंवा कमेंट केली आहे. दहापैकी एकाने कोणत्या ना कोणत्या ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. ऑफकॉमने म्हटले की, १७ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गची यामध्ये भूमिका आहे. संशोधनात पालकांनाही प्रश्न विचारण्यात आले. मुले नुकसान पोहोचवू शकणारी सामग्री पाहतात, असे त्यांना वाटते. ५ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी ८७% पालकांनी मुलांना ऑनलाइनपासून कसे सुरक्षित ठेवावे यावर सल्ला मागितला.
ऑफकाॅमने ‘द एज ऑफ डिजिटल इंडिपेंडन्स’ अहवालात ही माहिती दिली
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.