आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमासने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव लावला फेटाळून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील शांततेसाठी अमेरिकेने दिलेला शांतता प्रस्ताव हमासने फेटाळून लावला. जेरुसलेम इस्रायलची राजधानी कायम राहील, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रस्तावात म्हटले होते. या प्रस्तावाला पॅलेस्टाइनमधून जोरदार विरोध होऊ लागला असून लोक रस्त्यावर उतरले आहेत.

हमासचे राजकिय ब्यूराे प्रमुख इस्माइल हनिएह यांनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा करतांना सांगितले की, पश्चिम आशियात शांततेसाठीची अमेरिकेची योजना पॅलेस्टाइनच्या राष्ट्रीय प्रकल्पापासून सुटका करुन घेण्याची एक प्रयत्न आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावानुसार पॅलेस्टाईनच्या लोकांचे आपले एक राज्य असेल.

अमेरिका आणि इस्रायल कराराच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांची योजना दोन्ही राष्ट्रांचे समाधान करेल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. या शांतता प्रस्तावांतर्गत जॉर्डन खोऱ्यात इस्त्रायलचे प्रभुत्व असायला हवे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केल्याचे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले.या प्रस्तावानुसार वेस्ट बँकमध्ये इस्रायलच्या वसाहती बेकायदेशीर आहेत. तसेच १९६७ मध्ये झालेल्या अरब- इस्त्रायल युद्धाआधीच्या सीमांच्या आधारांवर समस्या सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आपसातील संमतीने जमिनीची देवाण- घेवाणही करता येईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत 'डील ऑफ द सेंचुरी' म्हणजे शांतता प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव हमासने फेटाळून लावला आहे. हमासचे वरिष्ठ अधिकारी खलील अल- हाय्या यांनी सांगितले की, पॅलेस्टाइन राष्ट्रासाठी जेरुसलेमव्यतिरिक्त दुसऱ्या राजधानीचा पर्याय स्वीकारण्याजोगा नसल्याचेे त्यांनी स्पष्ट केले.संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, महासचिवांनी प्रस्ताव पाहिला आहे.

पत्रकार परिषदेत प्रस्ताव केला सादर

डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत 'डील ऑफ द सेंचुरी' म्हणजे शांतता प्रस्ताव सादर केला.

प्रस्तावाविरोधात गाझा पट्टीत आंदाेलन, १२ जण जखमी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पॅलेस्टाइनने विरोध केला आहे. इस्रायलच्या लष्करासोबत झालेल्या संघर्षात पॅलेस्टाइनचे १२ नागरीक जखमी झाले. जेरुसेलममध्ये अल इजारिया भागात पॅलेस्टाइन नागरिक आणि इस्त्रायलचे जवान यांच्यात संघर्ष झाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी अश्रुधुराचा वापर केला. यात १२ जण जखमी झाल्याचे रेड क्रिसेंटचे प्रवक्ते इराब अल फुकाहा यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...