Hard Operation / दातात धरून ठेवली होती हिजाब पिन, शिंक येताच गेली फुफ्फुसात; 6 दिवसांनी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

हमीदिया रूग्णालयात तज्ज्ञांनी 6 दिवसांनंतर ब्रॉन्कोस्कॉपीद्वारे पिन बाहेर काढली
 

दिव्य मराठी वेब

Jun 16,2019 05:26:00 PM IST

भोपाळ (मध्यप्रदेश) - येथील एका 9 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानीच्या पोटात हिजाबला लावायची पिन अडकली. सानिया जमील अहमद असे या विद्यार्थिनीचे असून ती आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी तयार होत होती. यादम्यान एक हिजाब पिन तिने तोंडात दाबून ठेवली होती. पण शिंक आल्यामुळे तोंडात असलेली पिन सरळ फुफ्फुसात जाऊन अडकली. त्यामुळे नातेवाईकांनी सानियाला उपचारासाठी अनेक रूग्णालयात घेऊन गेले पण कठीण ऑपरेशन असल्यामुळे सर्व डॉक्टरांनी नकार दिला.

विदिशातील रहिवासी असणारी सानिया जमील अहमद 9 जूनला रात्री नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी बुरखा घालत असताना तिने हिजाब पिन दातांमध्ये दाबुन ठेवली होती. पण अचानक शिंक आल्यामुळे पिन श्वासनलिकेद्वारे खाली फुफ्फूसात गेली. हमीदिया रूग्णालयातील डॉक्टरांनी तिचा एक्सरे केल्यानंतर सत्य समोर आले. त्यामुळे डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कॉपीद्वारे पिन बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.


2.5 सेंटीमीटर लांबीची पिन
हमीदिया रूग्ण्यालयाचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. यशवीर जेके यांनी सांगितले की, ही पिन सुमारे 2.5 सेंटीमीटर लांबीची होती. रूग्णाची श्वासनलिका लहान असल्यामुळे ऑपरेशन करणे कठिण झाले होते. त्यामुळे पल्मोनरी विभागाचे तज्ज्ञ डॉ. पराग शर्मा यांची मदत घेण्यात आली.

ब्रॉन्कोस्कॉपी म्हणजे काय?
ब्रॉन्कोस्कॉपी तंत्रज्ञानाद्वारे श्वसनमार्गाच्या अंतर्गत भागात येणाऱ्या समस्या तपासल्या जातात. यासाठी ऑप्टीक फायबरला तोंड किंवा नाकाच्या नलिकेत सोडले जाते. येथून हे फायबर श्वासनलिकेत जाते. यामध्ये एक कॅमेराही लावण्यात आलेले असतो.

मुलीच्या जीवाला होता धोका
हमीदिया रूग्णालयाचे डॉ. परागनुसार, सानियाची तपासणी केल्यानंतर समजले की, पिन तिच्या श्वासनलिकेच्या खाली फुफ्फूसाच्या तिसऱ्या भागात अडकल्याचे आढळून आले. त्यामुळे ब्रॉन्कोस्कॉपी ऑपरेशन करून पिन काढण्यात आली. पण जर पिन काढली नसती, तर मुलीच्या जीवाला धोका झाला असता.

दीड तास सुरू होते ऑपरेशन
ऑपरेशन अत्यंत कठीण असल्यामुळे नातेवाईकांनी खासगी रूग्णालयात दाखल केले. पण खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी यासाठी नकार दिला. त्यामुळे मुलीला हमीदिया रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी हे कठीण ऑपरेशन करून तिचा जीव वाजवला. तसेच, हे ऑपरेशन करण्यास दीड तास लागले होते.

X
COMMENT