आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 2300 रूपयांमध्ये खरेदी करू शकता 28 कोटींचा बंगला, 6 बेडरूम आणि चित्रपटगृहासह आहेत इतरही सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅम्प्शायर - इंग्लंडमधील एक लखपती स्वतःचा 28 दशलक्ष डॉलर्स किमतीचा आलिशान बंगला विकत आहे. कोणताही व्यक्ती फक्त 2300 रुपये खर्च करून या बंगल्याचा मालक होऊ शकतो. एका तिकीट प्रक्रियेद्वारे या आलिशान बंगल्याची विक्री होत आहे. या तिकिटाची किंमत 2300 रूपये असुन ज्या टिकीटाचा नंबर लकी ड्रॉ मध्ये येईल तोच विजेता या आलिशान बंगल्याचा मालक होईल. तर लकी ड्रॉ मध्ये दुसरा क्रमांक पटकावणाऱ्याला नवीकोरी इस्टन मार्टिन कार मिळणार आहे. तिन्ही मुलं शहरातून बाहेर पडल्यानंतर, त्यांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे घर मालकाचे म्हणणे आहे. 

 

बंगल्याची किंमत फक्त 2300 रूपये.
>>  हॅम्प्शायरमधील लखपती ब्रेसफोर्ड रिंगफोर्डजवळ स्थित असलेला एवन प्लस आलिशान बंगला विकत आहेत. यासाठी त्यांनी तिकीट प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले. 

>> एका तिकीटाची किंमत फक्त 2300 रूपये आहे. लकी ड्रॉ मध्ये निवडला जाणारा विजेता या बंगल्याचा मालक असणार आहे. 

>>  रनरअप प्राइज जिंकणाऱ्याला लोकल इस्टन शोरूम मध्ये जाण्याची संधी मिळणार असुन तेथुऩ त्यांच्या आवडीची कोणतीही कार मोफत खरेदी करता येणार आहे. 

>>  घराची वास्तविक किंमत मिळवी यासाठी घरमालकाने 120,000 तिकिटे विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जर ह्यापेक्षा जास्त तिकीट विक्री झाली तर शिल्ल्क आलेली रक्कम चॅरटीला देण्याचा निर्णय घरमालकाने घेतला आहे. 

>> घर खरेदीसाठी फक्त 31 डिसेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तर 9 जानेवारीला लकी ड्रॉ काढण्यात येऊन विजेत्याचे नाव घोषित करण्यात येणार आहे. 

 

घर विकण्याचे कारण काय?
>>12 वर्षांपासून मार्क बेरेसफोर्ड आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत येथे होते. नोकरी आणि करिअरसाठी मुले घरापासून लांब गेली. अशा परिस्थितीत हे दाम्पत्य आपल्या मुलांसोबत ईस्ट ससेक्स येथे राहणार असल्यामुळे त्यांनी बंगला विकण्याचे ठरविले आहे.

 

बंगल्यातील वैशिष्ट्ये 

 

>> एका एकरामध्ये बांधलेल्या बंगल्यात 6 डबल बेडरूम, 7 रिसेप्शन रूमसोबत एक गेम आणि स्नूकर रूम आहे. याव्यतिरिक्त 65 इंच पडदा असलेले एक चित्रपटगृह आहे. स्वयंपाकघर देखील हायटेक असुन सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे. याचबरोबर आलिशान बंगला एवन नदीकिनारी बांधला असल्यामुळे याठिकाणी फिशिंग करण्याची संधी आहे. 

>>  एकूणच सर्व हायटेक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बंगल्याचा महिनाभराचा खर्च कमी आहे. गॅस, वीज आणि पाणी यांचा महिनाभरात 25000 हजार रूपये खर्च येतो.  

 

बातम्या आणखी आहेत...