आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या कारवाईत ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा, अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज(शनिवार) मोठी माहिती समोर आणली आहे. त्यांनी सांगितले की, अलकायदा या दहशदवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा(30) याचा एका लष्कराच्या कारवाईत खात्मा झाला आहे. ट्रम्प यांनी सांगितल्यानुसार, हमजाचा खात्मा अफगाणिस्तान/पाकिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्यात झाला आहे, पण कधी झाला याची अधिकृत माहिती नाहीये. पण, मीडियामध्ये हमजाचा मृत्यू मागिल महिन्यात झाल्याचे सांगितले जात आहे.ट्रम्प म्हणाले, "हमजाच्या मृत्यूमुळे फक्त अलकायदालाच नुकसान झाले नाही, तर इतर दहशदवादी कारवायाही कमी झाल्या आहेत. हमजाने अनेक दहशदवादी संघटनांसोबत मिळून बऱ्याच कारवाया केल्या आहेत."अमेरिकेने हमजावर मोठे बक्षीस घोषित केले होते
मार्चमध्ये अमेरिकेने हमजाचा ठिकाणा सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर (अंदाजे 7.1 कोटी) रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अमेरीकेकडून सांगण्यात आले होते की, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमजा अमेरीका आणि इतर देशांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्यात सौदी अरबनेही हमजाचे नागरिकत्व रद्द केले होते.

बातम्या आणखी आहेत...