आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जोधपूर- प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण मानल्या जाणाऱ्या प्लास्टिकशी भलेही जग झुंज देत असले तरी राजस्थानातील जोधपूरने त्यावर एका मार्ग काढला आहे. सामान्यपणे १५-२० रुपयांत खरेदी केलेली पाण्याची बाटली पाणी पिऊन झाल्यावर फेकली जाते. जोधपूरच्या हँडीक्राफ्ट निर्यातदारांनी या बाटल्यांना भेटवस्तू तसेच सजावटीच्या आकर्षक साहित्याचे रुपडे दिले आहे.
अशा उत्पादनांची २० डॉलर अर्थात १४० ते १४०० रुपयांत विक्री केली जात आहे. भंगारातून घेतलेल्या बाटल्यांतून नवनवीन वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यातून वार्षिक सुमारे १०० कोटी रुपयांची उत्पादने परदेशात निर्यात केली जात आहेत. टाकाऊ प्लास्टिकपासून सर्वाधिक प्रमाणात प्लास्टिक धाग्यांची निर्मिती होते.
देशात प्लास्टिक धाग्यांची सर्वाधिक निर्मिती पानिपतमध्ये होते. परंतु आता त्याचे उत्पादन जोधपूर व जयपूरमध्येही होऊ लागले आहे. या प्लास्टिकच्या धाग्यांपासून चटई तयार केली जाते. त्याचबरोबर कच्चा माल म्हणून या धाग्यांचा वापर इतर अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी साह्याभूत ठरतो. या उत्पादनांना आता अमेरिका, युरोपीय देशांतही निर्यात केले जात आहे. विविध देशांतून त्याची मागणी वाढली आहे. हे धागे वुलनच्या उत्पादनासारखे असतात. केवळ घरातच नव्हे तर उन्हातही अशा वस्तूंचा वापर करणे शक्य होते.
कच्चा माल म्हणून या बाटल्या ६० त ६५ रुपये किलो दराने विकल्या जातात. बाटल्यापासून फायबर भुकटी बनवली जाते. ही भुकटी ९० रुपये किलो दराने विक्री होते. या फायबरपासून धागे बनवले जातात. त्याला गुणवत्तेनुसार किलोमागे १३० ते १४० रुपये एवढा भाव मिळतो. फायबर हिमाचल व सुरतमधूनही मागवले जात आहे.
वस्तूंच्या पुनर्वापराचे केंद्र म्हणून जोधपूरची ओळख आहे. आतापर्यंत भंगारातील लोखंडाच्या वस्तू, जुन्या गाड्या, सायकल, रेल्वे रुळाचे तुकडे, रिक्षा इत्यादीपासून नवीन वस्तू तयार करून त्याची परदेशात निर्यात केली जात होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून जोधपूरमधून प्लास्टिकपासून तयार वस्तूंची उलाढाल वाढली. ती सुमारे १५० कोटी रुपयांवर पोहोचली. राजस्थानमधील हा प्रयोग प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी निश्चितच चांगला ठरू शकतो.
जोधपूरमध्ये सहा महिन्यांत १५० कोटींची निर्यात
जोधपूरचा हस्तकला उद्योग आता पर्यावरणस्नेही बनला आहे. येथील निर्यातदारांच्या संवेदनशीलता व नवीन प्रयोगांमुळे भंगाराला नवऊर्जा मिळाली. ही उत्पादने परदेशात पाठवली जात आहेत. त्यामुळे उद्योगांना संजीवनी आणि तरुणांना रोजगार मिळू लागला आहे.
- डॉ. भरत दिनेश, अध्यक्ष, जोधपूर, हँडीक्राफ्ट एक्स्पोर्टर्स असो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.