आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग माजी सैनिकाने बसल्या जागी उचलले ५०५ किलोचे वजन; गिनीज बुकात नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमधील दिव्यांग माजी सैनिक मार्टिन टॉय यांनी बसल्या जागी ५०५ किलो वजन उचलून विश्वविक्रम केला असून, त्यांच्या या कामगिरीची गिनीज बुकमध्ये नाेंद झाली अाहे. दिव्यांग व्यक्तीदेखील काहीही करू शकते. अाम्ही काेणत्याही प्रकारे दुर्बल नाहीत, हे जगाला दाखवून देण्यासाठी मला हे करावे लागले, असे टाॅय यांनी ही कामगिरी केल्यानंतर सांगितले. इंग्लंडच्या व्राक्सल या गावात गत ६ मे राेजी ही स्पर्धा आयाेजित झाली. 


स्थानिक मीडियानुसार मार्टिन हे ब्रिटिश लष्करात लान्स कॉर्पोरेल हाेते व त्यांनी अनेक युद्धे पाहिली आहेत. २१ व्या वर्षी ते लष्करात भरती झाले हाेते. नाेकरीत असताना ऑगस्ट २००९ मध्ये त्यांना अफगणिस्तानमध्ये नियुक्ती मिळाली हाेती. तेथे काबूलमध्ये एका बॉम्बरने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला.

बातम्या आणखी आहेत...