आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिव्यांगांनी स्वत:ला कधीही कमी लेखू नये. काही तरी कारणांनी अपंगत्व आले तरी त्यावर जिद्दीने मात करता येते. आपल्यात असलेले कलागुण विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. जिल्हा परिषद सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहेत. शासनाने अपंगांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेमार्फतही अपंग शिक्षकांच्या वाहन भत्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. साह्य उपकरणे वितरित करण्याचे कामही सुरू आहे. समाजकल्याण खाते सभापती परहर चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. ज्यांना दिव्यांग भूषण पुरस्कार मिळाला. त्यांच्यापासून इतरांनी स्फूर्ती घ्यावी, असे प्रतिपादन जि. प. उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी केले. 

 

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या नगर शाखेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषद सेवेतील १८ आदर्श दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी उपाध्यक्षा घुले बोलत होत्या. याप्रसंगी जि.प.समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर, समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, मंगला वराडे, लक्ष्मण पोकळे, शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले, अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप, संजय धामणे, बापू तांबे, राजू आव्हाड, सहादू मोढवे, पोपट धामणे, राजेंद्र औटी, बन्सी गुंड, संतोष सरवदे, उद्धव थोरात, किरण माने, प्रेमनाथ डोंगरे, सुनील मेचकर आदी उपस्थित होते. 

 

नितीन उबाळे म्हणाले, विळद घाटातील अपंग पुनर्वसन केंद्रात २१ प्रकारच्या अपंगत्वावर उपचारांची सुविधा देण्यात येणार आहे.त्या दृष्टीने आवश्यक सोयी- सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. दिव्यांगांना एसएडीएम प्रमाणपत्रातील पहिला भाग भरण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिक वेळ लागतो. तो भरण्याची व्यवस्थाही विळद घाटातील केंद्रात करण्यात येणार आहे. पुढील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत सर्व विभागातील गुणवंत दिव्यांग कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिव्यांग भूषण पुरस्कारांची माहिती दिली. या कार्यक्रमात काशिनाथ चिखले, अनिल गायकवाड, चरणसिंग काकरवाल, सोमनाथ वाबळे, गोरख वहाडणे, सूर्यभान वडितके, भाऊराव नागरे, भाऊसाहेब घोरपडे, रमेश शिंदे, मीरा बडे, सचिन लोंढे, संतोषकुमार वांडरे, कैलासबाई काळे, बाळासाहेब अनपट, अजित चहाळ, सुखदेव ढवळे, अमोल चन्ने, भाग्यश्री माचवे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 

अद्ययावत अपंग पुनर्वसन केंद्र उभारणार 
सभापती परहर म्हणाले, प्रयत्न केल्यास दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते. भारताचे कसोटीपटू मन्सूर अली पतौडी हे एका डोळ्याने अधू होते. तरीही त्यांनी उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून नाव कमावले. असे अनेक दिव्यांग आदर्श आहेत. नगर जिल्ह्यात अपंगांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याचे काम मार्गी लागत असून विळद घाटात अद्ययावत अपंग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...