आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने 7 दिवस चॅटिंग केल्यामुळे वाकडी झाली बोटे, फोन महागडा असल्याने सतत जवळ बाळगत होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमधील चंगासा शहरातील एका महिलेने सलग सात दिवस मोबाइल फोन हाताळला. त्यामुळे तिच्या हाताची बोटेच वाकडी झाली आहेत. त्यामुळे तिला डॉक्टरकडे धाव घ्यावी लागली. तेव्हा कुठे ती दुरुस्त झाली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या महिलेने एक आठवड्याची सुटी घेतली होती. तिने बाहेरगावी फिरण्यास जाण्याऐवजी घरात राहणेच पसंत केले. यादरम्यान ती मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग करायची. फक्त झोपतानाच ती फोन बाजूला ठेवत असे. तिचा फोन खूप महागडा होता. यासाठी ती नेहमी फोन जवळच बाळगत होती. एक दिवस तिचा हात दुखू लागला. तिच्या हाताची बोटे वाकडी झाली. तिने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनी उपचार केले. पण तिला फोनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...