आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिल्लोड - “मला बदल्याला बदला पाहिजे, माझ्या मम्मीला जाळणाऱ्याला फाशी द्या, नाहीतर माझ्या हवाली करा, मी त्याला जाळते”, असे म्हणत तालुक्यातील अंधारी जळीतकांडातील मृत महिलेची मुलगी अनिता कांबळे हिने आईला अग्निडाग देताना आर्त टाहो फोडला. अंधारी गावात तणावपूर्ण वातावरणात व मोठ्या पोलिस बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरीर सुखाला नकार देणाऱ्या महिलेला राॅकेल टाकून जाळण्याचा माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार गावात घडला हाेता. संतोष सखाराम मोहितेने दोन फेब्रुवारीला रात्री ११ वाजता राॅकेल टाकून महिलेला जाळले होते. पीडितेचा उपचारादरम्यान पाच फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. जळीत कांडातील पीडितेची लहान मुलगी अनिता कांबळे हिने गुरुवारी (दि.६) आईला अग्निडाग दिला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सूत्रधार संतोष सखाराम मोहितेला फाशी देण्याची मागणी समाजातील सर्व स्तरातून करण्यात येत आहे. वातावरणात तणावपूर्ण शांतता होती. गुरुवारी दुपारी दीड वाजता औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून मृतदेह अंधारी येथे गावी आणल्यानंतर पीडितेच्या दोन्ही मुलींसह नातेवाइकांच्या भावनांचा बांध फुटला. दोन्ही मुलींनी आर्त टाहो फोडून मृत्यूचा बदला मृत्यू पाहिजे असे म्हणत नराधम संतोष मोहितेला फाशी देण्याची मागणी केली. या वेळी प्रशासनाच्या वतीने उपस्थित असलेले नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल व कुटुंबाला नियमानुसार मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश गावडे बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
ती जळत होती तो नराधम हात बांधून मागे उभा होता
अंत्यसंस्काराच्या वेळी आपले दुःख सांगताना पीडित मृत महिलेची शेजारीच राहणारी मोठी मुलगी सांगत होती. आईच्या घरात आरडाओरडा एेकूण मी घरी गेले तेव्हा आई जळत होती. तेव्हा तो तिच्या मागे उभा होता. आम्ही आत गेल्यावर तो बाहेर निघून गेला. आम्ही आग विझवली, असे सांगून तिने टाहो फोडला.
संतप्त नातेवाइकांच्या मागण्या
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.