आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: हार्मोनल इंजेक्शन्समुळे वयापेक्षा मोठी दिसली होती हंसिका, बालपणीच वडिलांनी सोडले वा-यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडची क्यूट आणि सेक्सी अॅक्ट्रेसपैकी एक हंसिका मोटवानी आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. 2003 साली 'शाका लाका बूम बूम' या हिंदी मालिकेतून हंसिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.


हंसिकाचा जन्म 9 ऑगस्ट 1991 रोजी बिझनेसम प्रदीप मोटवानी यांच्या घरी झाला. हंसिकाचे कुटुंबीय बौद्ध धर्माला फॉलो करतात. मुंबईतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील हंसिका प्रसिद्ध नाव आहे. टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली तिला हृतिक रोशन स्टारर 'कोई मिल गया' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात हंसिकाने बालकलाकाराची भूमिका निभावली होती.

 

मोठे दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स घ्यायची हंसिका... 
2007 साली हंसिका हिमेश रेशमियासोबत 'आपका सुरूर' या चित्रपटात झळकली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती. पण चित्रपटात ती वयापेक्षा मोठी दिसली होती. बातम्यांनुसार, हंसिकाची आई त्वचा तज्ज्ञ आहे. लवकरच मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन्स घेतल्याची चर्चा होती. पण यावर हंसिका किंवा तिच्या कुटुंबीयांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता. या चित्रपटात हंसिकाने तिच्यापेक्षा वयाने 18 वर्षांनी मोठ्या हिमेशसोबत रोमान्स केला होता.  

 

एमएमएस झाला होता लीक... 

हंसिकाचे नाव वादातसुद्धा अडकले आहे. तिचा बाथरुम एमएमस लीक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. 2015 मध्ये तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाला होता. त्यात ती शॉवरखाली अंघोळ करताना दिसली होती. 

 

या फिल्ममुळे झाली होती साऊथमध्ये फेमस.. 
2007 सालीच हंसिका 'देसमुदुरु' या चित्रपटात लीड रोलमध्ये झळकली होती. या चित्रपटासाठी तिला साऊथचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर तिची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली होती. या चित्रपटाने तिला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून सामावून घेतले.

 

पुढे वाचा, हंसिकाच्या नावाने उभारण्यात आले आहे मंदिर... वडील सोडून निघून गेले... यासह बरंच काही.. 

बातम्या आणखी आहेत...