आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारताचे युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण रथावरून उतरले, हनुमानही रथावरून उडून गेले अन् मग रथ जळून भस्म झाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - 29 डिसेंबर, शनिवारी हनुमान अष्टमी आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला हनुमंताशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत. महाभारतानुसार, युद्धादरम्यान अर्जुनाच्या रथावर स्वयं हनुमानजी विराजित होते. युद्ध समाप्त झाल्यानंतर जेव्हा हनुमंत निघून गेले, तेव्हा काय झाले.. तो पूर्ण प्रसंग असा आहे...


यामुळे अर्जुनाचा रथ जळून झाला भस्म
- महाभारतानुसार, जेव्हा कौरव सैन्याचा नाश झाला तेव्हा दुर्योधन पळून एका तलावात लपला. पांडवांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान दिले.
- दुर्योधन तलावातून बाहेर निघाला आणि भीमाने त्याचा पराभव केला. दुर्योधनाला मरणासन्न अवस्थेत सोडून पांडव आपापल्या रथांवरून कौरवांच्या शिबिरात आले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला आधी रथातून उतरण्यासाठी सांगितले, नंतर स्वत: उतरले. 
- श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमंतही उडून गेले. तेव्हा पाहता-पाहताच अर्जुनाचा रथ जळून राख झाला. हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले?
- तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, हा रथ दिव्यास्त्रांच्या हल्ल्यामुळे आधीच जळून गेलेला होता, फक्त मी बसून राहिल्याने अद्याप भस्म झालेला नव्हता. जेव्हा तुझे काम पूर्ण झाले, तेव्हा मी हा रथ सोडला. यामुळे हा आताच भस्म झाला आहे.


अर्जुनाच्या रथावर का बसले होते हनुमंत?
- वनवासादरम्यान पांडव जेव्हा बद्रिकाश्रमात राहत होते, तेव्हा एका दिवशी तेथे एक सहस्त्रदल कमल उडत आले. द्रौपदीने भीमाला तसेच कमळ आणून देण्यासाठी सांगितले.
- भीम कमळाचे फूल आणण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेला. त्या पर्वतावर हनुमंतांचा निवास होता. जेव्हा हनुमंतांना कळले की, भीम पर्वतावर येत आहे, तेव्हा ते वृद्ध वानराचे रूप घेऊन वाटेत झोपले.
- वाटेत वृद्ध वानराला झोपलेले पाहून भीमाने त्यांना वाट देण्यासाठी सांगितले. तेव्हा हनुमंताने म्हटले की, तू माझी शेपूट हटव आणि निघून जा. परंतु खूप प्रयत्न करूनही भीम असे करू शकला नाही.
- भीमाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने हनुमंताला आपल्या वास्तविक रूपात येण्याची प्रार्थना केली. तेव्हा हनुमंताने भीमाला सांगितले की, या पर्वतावर देवतांचा निवास आहे. यामुळे मी तुला पुढे जाण्यापासून रोखत होतो.
- हनुमंतांनी भीमाला वरदान दिले की, जेव्हा पांडव आणि कौरवांचे युद्ध होईल, तेव्हा मी अर्जुनाच्या रथावर बसून अशी भीषण गर्जना करेल की ज्यामुळे शत्रूंचे प्राण सुकून जातील आणि तू तेव्हा त्यांना सहज मारू शकशील. 

 

 

बातम्या आणखी आहेत...