Home | Jeevan Mantra | Dharm | hanuman jayanti 2019 importance of sunderkand

सुंदरकांडमध्ये हनुमानाने सांगितले आहे की, यश कसे मिळते आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे

रिलिजन डेस्क | Update - Apr 18, 2019, 12:01 AM IST

19 एप्रिलला हनुमान जयंती, रावणाने आपल्या दरबारात पवनपुत्र हनुमानाला मारण्याचा निश्चय केला होता परंतु नंतर हनुमानाच्या शे

 • hanuman jayanti 2019 importance of sunderkand

  शुक्रवार 19 एप्रिलला चैत्र मासातील पौर्णिमा आहे. या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. मान्यतेनुसार, हनुमानाचा जन्म त्रेतायुगामध्ये याच तिथीला झाला होता. श्रीरामचरितमानसचा पाचवा अध्याय सुंदरकांड आहे. हा श्रीरामचरितमानसमधील सर्वात जास्त वाचला जाणारा भाग आहे कारण यामध्ये बजरंगबलीच्या बळ, बुद्धी, पराक्रम आणि शौर्याचे वर्णन करण्यात आले आहे. सुंदरकांडमध्ये यश प्राप्तीचे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. सुंदरकांडमध्ये पवनपुत्र हनुमानाने सांगितले आहे की यश कसे प्राप्त करावे आणि यश मिळाल्यानंतर काय करावे?


  सुंदरकांडच्या प्रत्येक दोह्यामध्ये सखोल अध्यात्म दडलेले आहे. यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. सुंदरकांडनुसार रावणाने आपल्या दरबारात हनुमानाला मारण्याचा निश्चय केला होता. रावणाला या कामामापासून थांबवण्यात आल्यानंतर त्याने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचे आदेश दिले.


  सुनत बिहसि बोला दसकंधर। अंग भंग करि पठइअ बंदर।।


  > हे ऐकताच रावण हसून म्हणाला- 'अच्छा, तर बंदराला अंग-भंग करून पाठवावे'


  जिन्ह कै कीन्हिसि बहुत बड़ाई। देखउं मैं तिन्ह कै प्रभुताई।


  ज्यांचे याने येथे एवढे कौतुक केले आहे, त्यांची मला थोडीशी प्रभुता तर पाहू द्या.


  > येथे रावण आणि हनुमान भय आणि नैर्भयतेच्या स्थितीमध्ये आहेत. रावण वारंवार यामुळे हसत आहे कारण तो आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करत आहे.


  > रावण म्हणाला - 'मला या वानराच्या स्वामींची ताकद पाहण्याची इच्छा आहे.'


  > प्रभू श्रीरामाचे सामर्थ्य पाहणायमागे त्याला त्याचा मृत्यू दिसत होता, याउलट हनुमान मृत्यूच्या भयापासून मुक्त होते.


  > रावणाचे चित्त अशांत होते तर हनुमान शांत चित्ताने बोलतही होते आणि पुढची योजनाही आखत होते. आपल्याला जीवनात कोणतेही विशेष काम करण्याची इच्छा असल्यास निर्भयता आणि मन शांत ठेवणे आवश्यक आहे.

Trending