Home | Jeevan Mantra | Dharm | Hanuman Jayanti 2019 Pujan Vidhi importance

हनुमानाची पूजा कोणकोणत्या अवस्थेमध्ये करू नये आणि का?

रिलिजन डेस्क | Update - Apr 17, 2019, 12:01 AM IST

Hanuman Jayanti 2019: स्नान न करता, काही खाल्ल्यानंतर पाणी पिल्याशिवाय आणि अस्वच्छ कपड्यांमध्ये करू नये हनुमानाची पूजा 

 • Hanuman Jayanti 2019 Pujan Vidhi importance

  धर्म ग्रंथानुसार, चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला भगवान हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातो. यावेळी 19 एप्रिल, शुक्रवारी हनुमान जयंती आहे. या निमित्ताने उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा सांगत आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये हनुमानाची पूजा करू नये...


  अस्वच्छ कपड्यात...
  काही लोक स्नान आटोपल्यानंतर लगेच टॉवेल गुंढाळून इनरवियरमध्येच हनुमानाची पूजा करतात. हनुमानाची पूजा करण्याची ही चुकीची पद्धत आहे. हनुमानाची पूजा करताना शुद्धतेची पूर्ण काळजी घ्यावी लागते. घाणेरड्या कपड्यात हनुमानाची पूजा करू नये.


  स्नान न करता...
  हनुमानासह अन्य देवी-देवीदेवतांची पूजा स्नान न करता करू नये. धर्म ग्रंथांमध्ये सकाळी स्नान केल्यानंतर देवतांची पूजा करण्याचे सांगण्यात आले आहे. स्नान न करता हनुमानाच्या प्रतिमेला स्पर्श देखील करू नये. याचे नकारात्मक परिणाम भविष्यात पाहायला मिळू शकतात.


  शवयात्रेहून आल्यानंतर...
  शवयात्रेहून आल्यानंतर शुद्धी केल्याशिवाय म्हणजे स्नान केल्याशिवाय कोणत्याच देवी-देवतेला स्पर्श करू नये. हा नियम आहे. हनुमानाच्या पूजेत देखील याची विशेष काळजी घ्यावी.


  अशुद्ध अवस्थेत...
  अनेक लोक अशुद्ध अवस्थेत देखील हनुमानाची पूजा करतात. हे अतिशय चुकिचे आहे. अशुद्ध अवस्थेत म्हणजे जर तुम्ही दिवसभर काम करून घरी आला असाल, तर तुम्ही दिवसभरात ज्या लोकांना भेटलात त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती नसते. त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यानंतर आधी स्नान करावे, नंतरच हनुमानाची पूजा करावी.


  जेवल्यानंतर पाणी न पीता....
  काहीही खाल्यानंतर पाणी नक्की प्यावे. नंतर गुळणी करावी. यामुळे मुख शुद्ध होते. जेवल्यानंतर उसट्या तोंडाने कोणत्याही देवाची-पूजा करणे निषेध मानण्यात आले आहे. या बाबीची विशेष काळजी घ्यावी.


  सूतक पडल्यानंतर...
  कुटुंबात एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचे उत्तर कार्य (13 दिवस) होईपर्यंत हनुमानाची पूजा करू नये. या काळाला सूतक म्हणतात.


  कुटुंबात आपत्य जन्मल्यानंतर...
  कुटुंबातील कोणाकडेही आपत्याचा जन्म झाल्यानंतर 10 दिवस हनुमानाची व इतर देवी-देवतांची पूजा करू नये.

Trending