Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | hanuman jayanti 2019 worship vidhi

हनुमान जयंतीला पूजा करताना बजरंगबलीला लाल आणि पिवळे फुल अवश्य अर्पण करावे, सकाळ, दुपार आणि संध्याकाळी वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा

रिलिजन डेस्क | Update - Apr 19, 2019, 12:03 AM IST

सुंदरकांडचा पाठ करताना हनुमानाला शेंदूर, चमेलीचे तेल अर्पण करावे

 • hanuman jayanti 2019 worship vidhi

  प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांची जयंती शुक्रवार 19 एप्रिलला आहे. हनुमान चालीसामध्ये लिहिले आहे की- अष्ट सिद्धि नवनिधि के दाता। अस बर दीन जानकी माता। या चौपाईनुसार, हनुमानाला देवी सीताने अष्टसिद्धी आणि नवनिधियां प्रदान केल्या होत्या. या सिद्धी हनुमान आपल्या भक्तांनाही प्रदान करतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत, जे हनुमान जयंतीला पूजा करताना लक्षात ठेवावेत...


  1. सकाळच्या वेळी हनुमानाला प्रसाद स्वरूपात गूळ, नारळ, लाडू अर्पण करावेत. दुपारच्या वेळी बजरंगबलीला गूळ, तूप, गव्हाच्या पोळीचा चुरमा अर्पण करू शकता.


  2. हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. यामुळे भक्तांनी यांना तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
  3. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचा पाठ करणे श्रेष्ठ उपाय आहे.


  4. संध्याकाळी हनुमानाला फळांचा उदा. केली, पेरू, सफरचंदचा नैवेद्य दाखवावा.
  5. बजरंगबलीचा शृंगार किंवा वस्त्र अर्पण करताना तिळाच्या किंवा चमेलीच्या तेलामध्ये मिसळेलंलं शेंदूर लावावा.


  6. हनुमानाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे फुल विशेष प्रिय आहे. या फुलांमध्ये कमळ, झेंडू, गुलाब यांचे विशेष महत्त्व आहे.
  7. श्रीरामाचे अनन्य भक्त बजरंगबलीची कृपा प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचर्यचे पालन आवश्यक आहे.

Trending