आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तिरंगा फडकावला लेह पॅलेसपासून ३ किमी लांब शाही स्वारी काढली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताराचंद गवारिया

लेह - लडाख आता केंद्रशासित राज्य झाले आहे. यामुळे लेहमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लोकांनी मुख्य बाजारपेठेत खांबांवर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावले होते. लेह पॅलेसच्या छतावर तयार करण्यात आलेल्या व्हरांड्यात राजा सिंघे नामग्याल यांची भूमिका साकारणारे टुंडूप डोरे राजाच्या वेषात बाहेर आले. त्यांनी मंत्र्यांसमवेत देवाची पूजा केली. त्यानंतर महालातील ५० सदस्यांसह ते बाहेर पडले. दरम्यान तीन किमी लांबीची फेरी काढण्यात आली. यात हजारो लोकांचा सहभाग होता. दरम्यान पेट्रोल चौकात राजा सिंघे नामग्याल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पर्यटन विभागाच्या उत्तर भारताचे संचालक अनिल औरव यांनी म्हटले, लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर शुक्रवारी ऐक्यसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुले व तरुणांचा सहभाग होता. 
 
 

बातम्या आणखी आहेत...