एका कारणांमुळे \'आई\' / एका कारणांमुळे 'आई' होऊ शकल्या नाहीत सायरा बानो, 22 व्या वर्षी 44 वर्षांच्या दिलीप कुमारांसोबत केले होते लग्न

दिव्य मराठी वेब टीम

Aug 23,2018 05:43:00 PM IST

हेल्थ डेस्क: सायरा बानो आज 74 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांनी 1966 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले. दिलीप कुमार यांनी आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितले होते की, 1972 मध्ये सायरा बानो प्रेग्नेंट होत्या, परंतू त्याच काळात त्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या झाली. त्यावेळी त्यांना 8 वा महिना सुरु होता. हाय ब्लड प्रेशरमुळे सर्जरी करणे शक्य होत नव्हते. याच काळात जीव गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. यानंतर त्या कधीच प्रेग्नेंट होऊ शकल्या नाहीत.


प्रेग्नेंसीच्या काळात महिलेची प्रत्येक हालचाल होणा-या बाळावर परिणाम करते. अशा वेळी प्रेग्नेंट महिलेला खुप सावध राहणे गरजेचे असते. अनेक लोक इच्छा असूनही बेबी प्लान करु शकत नाही. यामागे सध्याची लाइफस्टाइल आणि अनेक आरोग्यासंबंधीत समस्या जबाबदार असतात. आज आपण या कारणांविषयी जाणून घेऊया...


स्ट्रेस आणि डिप्रेशन
यामुळे महिलांमध्ये प्रोलेक्टीन नामक हार्मोन वाढते आणि ज्यामुळे प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येतात. हार्मोन इम्बॅलेन्समुळे प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येतात.

ओव्हरीमध्ये एग फॉर्मेशन होत नाही
अनेक वेळा महिलांच्या ओव्हरीमध्ये योग्य प्रकारे एग फॉर्मेशन होत नाही. झाले तरी ते नियमित होत नाही. यामुळे फर्टिलाइजेशन होऊ शकत नाही आणि महिला प्रेग्नेंट होऊ शकत नाहीत.

थायरॉइड आणि दूसरा आजार
महिलांमध्ये यूरिन इन्फेक्शन आणि यूट्रसमध्ये टीबीमुळे फेलोपियन ट्यूब खराब होते. महिलांमध्ये थायरॉइड, PCOSसारख्या हार्मोनल प्रॉब्लममुळे पीरियड्स डिस्टर्ब होतात. एग्ज प्रोडक्शनवर प्रभाव पडतो.

स्पर्म वीक होणे
महिला प्रेग्नेंट न होण्यामागे पुरुषही जबाबदार असतात. स्पर्म वीक असणे, स्पर्म काउंट कमी असणे, यामुळेही महिलांना प्रेग्नेंट होण्यात अडचणी येतात. आजकालच्या लाइफस्टाइलमुळे पुरुषांचे स्पर्म काउंट 35 ते 40 या वयात कमी होते.

लठ्ठपणा
महिलांच्या ओव्हरीमध्ये चरबी वाढल्यामुळे एग्ज डेव्हलप होऊ शकत नाही. प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येतात.


X
COMMENT