दलाई लामा म्हणाले / दलाई लामा म्हणाले - नकारात्मकता दूर करण्यासाठी भावनात्मक स्वच्छता गरजेची

दिव्य मराठी वेब टीम

Jan 21,2019 01:39:00 PM IST
नवी दिल्ली. दलाई लामा म्हणाले 'दैनिक भास्कर' मानवी जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे पाहून खूप अानंद हाेताेय. हाच दृष्टिकाेन अाम्हा सर्वांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान बनला पाहिजे. भारतातील प्रसारमाध्यमे सत्य व तथ्यांच्या अाधारे लाेकांना माहिती देतात. अाज सर्वच जण एकमेकांवर अवलंबून असल्याने प्राचीन भारतातील अहिंसा व करुणा ही मूल्ये महत्त्वपूर्ण ठरतात. ती लाेकांना अानंदी समाजनिर्मितीचा मार्ग दाखवतात. अहिंसा हा जगण्याचा मार्ग, तर करुणा प्रेरणा असल्याने मानवाला या दाेन्ही जीवनमूल्यांची खूप गरज अाहे. अापण सारे मूलत: एकच अाहाेत, अाम्हा सर्वांना एकमेकांसाेबत राहायचेय. ज्याप्रमाणे सुदृढ अाराेग्यासाठी शारीरिक स्वच्छता गरजेची, त्याचप्रमाणे क्राेध, ईर्षा व भीती या नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी भावनात्मक स्वच्छता अावश्यक अाहे. अापल्या जीवनात खाेटेपणा व धाेका या दुर्गुणांना स्थान नसेल तर हेच वैशिष्ट्य अापणास विश्वासार्ह बनवेल. अापण सर्व अात्महिताने प्रेरित हाेत असताे; परंतु असे करताना इतरांचे हितदेखील पाहिले पाहिजे. मी तरुणांना सांगू इच्छिताे की, त्यांनी स्वत:च्या अांतरिक मूल्यांवर लक्ष द्यावे. तसेच शांत राहावे व शांतता ठेवावी. असे केल्यानेच सर्व मानवजातीत एकाेपा निर्माण हाेऊ शकताे.
प्रार्थना व शुभेच्छांसह
- दलाई लामा

X
COMMENT