आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षीय बालिकेच्या प्रायव्हेट पार्टला एवढी दुखापत की, 3 दिवसांपासून सतत वाहतेय रक्त, भेदरलेली आहे चिमुरडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजनांदगांव (छत्तीसगड) - प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना आणि रक्त वाहिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल 7 वर्षीय बालिकेच्या लैंगिक शोषणाचे स्पष्ट झाले आहे. लालबाग पोलिसांनी मेडिकल रिपोर्टच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेडिकल रिपोर्टनुसार, चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हल्ल्यामुळे दुखापत झाली आहे. याला थेट लैंगिक शोषण मानले जात आहे. सतत 3 दिवस रक्त वाहिल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, आतापर्यंत याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही.


जाणून घ्या, केव्हा काय झाले...

 

18 सप्टेंबर : चिमुरडी शाळेतून घरी परतली, तेव्हा तब्येत ठीक नव्हती.
19 सप्टेंबर : मुलीला ताप आणि प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. यानंतर गावातील डॉक्टरांनी चेकअप केले. 
20 सप्टेंबर : गावातीलच डॉक्टरांनी तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला नेण्याचे सांगितले. यानंतर मुलीवर उपचार सुरू आहेत. 

24 सप्टेंबर : पोलिसांनी चिमुरडी, तिचे वडील आणि आईचा जबाब घेतला.
25 सप्टेंबर : पोलिसांनी सोनोग्राफीसह आवश्यक तपासण्या करवून घेतल्या, रिपोर्ट आले.
26 सप्टेंबर : लालबाग पोलिसांनी लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच, कलम 376 व पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.


दुसरीकडे, घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने शालेय पातळीवर घटनेची चौकशी केली. तथापि, शिक्षण विभागाच्या रिपोर्टमध्ये या प्रकारची कोणतीही संशयास्पद अॅक्टिव्हिटी होत नसल्याचा दावा केला आहे. विभागीय चौकशीत शाळेच्या महिला एच.एम. पासून ते 2 शिक्षकांचीही चौकशी झाली. यात त्यांनीही अशा प्रकारचे कृत्य झाल्याचे नाकारले.

 

चौकशी अहवालानुसार, चिमुरडीला शालेय परिसरात ना कोणती दुखापत झाली, ना लैंगिक अत्याचार झाला. यानंतर तपास अहवाल बीईओंनी जिल्हा शिक्षण अधिकारी प्रवास बघेल यांना सोपवला आहे. पोलिसही प्राथमिक पातळीवर शालेय प्रशासनाची चौकशी केल्याचा दावा करत आहेत. सुकुलदैहान शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय विद्यार्थिनीला 20 सप्टेंबरपासून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

 

भेदरलेली चिमुरडी काहीच सांगत नाही...
चिमुरडी भेदरलेली असून पोलिसांना काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही. परंतु पोलिसांनी प्राथमिकदृष्टया प्रकरणाला संशयास्पद मानून सर्व चौकशी केली जावी. मेडिकल रिपोर्टनुसार, चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला झाला आहे. यामुळेत सतत रक्तस्राव होत आहे. दुखापत एवढी जास्त आहे की, 3-4 दिवसांपासून रक्त वाहत आहे. यामुळे चिमुरडीला रुग्णालयात दाखल करावे लागले.

 

सुटी झाल्यावर उशिरापर्यँत घरी परतली नव्हती 
गावकऱ्यांमध्येही या घटनेबद्दल वेगवेगळी चर्चा आहे. प्राप्त माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी चिमुरडीचे लैंगिक शोषण झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे, त्या दिवशी कुटुंबीय तिला शोधत शाळेत गेले होते. गावकऱ्यांच्या मते, मुलगी घरी काहीही न सांगात बाहेर गेली होती आणि सुटी झाल्यावरही उशिरापर्यंत आली नव्हती. यामुळे तिचे आईवडील तिला शोधत बाहेर पडले होते, तेव्हा काही वेळाने ती आढळली.

 

बातम्या आणखी आहेत...