Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | harbara eating health benefits in marathi

बदामापेक्षा जास्त पोष्टिक पदार्थ आहे हरभरा, भिजवून खाल्ल्याने होतील हे खास फायदे

हेल्थ डेस्क | Update - Sep 12, 2018, 12:04 AM IST

हरभरे बदामासारख्या महागड्या पदार्थापेक्षा जास्त पौष्टिक व लाभदायक असतात. रोज सकाळी मूठभर हरभरे भिजवून खाल्ल्याने ताकद आण

 • harbara eating health benefits in marathi

  हरभरे बदामासारख्या महागड्या पदार्थापेक्षा जास्त पौष्टिक व लाभदायक असतात. रोज सकाळी मूठभर हरभरे भिजवून खाल्ल्याने ताकद आणि ऊर्जा मिळते. हरभऱ्यामध्ये बदामापेक्षा जास्त व्हिटॅमिन ए असते. बदामापेक्षा जास्त व्हिटॅमिन बी6, बी9, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. एक कप हरभऱ्यामध्ये एक कप बदामाच्या तुलनेत कार्बोहायड्रेट्ही जास्त असते. यामध्ये हानिकारक सॅचुरेटेड फॅटदेखील बदामाच्या तुलनेत कमी असतात.


  असे भिजवा हरभरे
  किशोरवयीन आणि तरुणांसाठी हरभरे एक पौष्टिक नाष्टा आहे. मूठभर गावरान काळे हरभरे चांगल्या प्रकारे स्वच्छ करून सायंकाळी पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी थोडा व्यायाम केल्यानंतर भिजवलेले हरभरे चांगल्या प्रकारे चावून खा आणि त्यावरून भिजवलेल्या हरभऱ्याचे पाणी तसेच प्या किंवा त्यात 1-2 चमचे मध मिसळून प्या.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, भिजवलेल्या हरभऱ्याचे फायदे...

 • harbara eating health benefits in marathi

  - भिजवलेले हरभरे दररोज सकाळी िनयमितपणे खाल्ल्याने कमजोरी दूर होते. 
  - किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता राहत नाही. 
  - शरीराची अंतर्गतरीत्या पूर्ण स्वच्छता होते. 

 • harbara eating health benefits in marathi

  - त्वचेचा उजळपणा वाढतो आणि रक्ताची कमतरता दूर होते. 
  - पचनक्रिया चांगली राहते. 
  - काम करण्याच्या क्षमतेत वाढ होते. 

Trending