आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता-भज्जीची 3rd Wedding अॅनिव्हर्सरी, खास कारणासाठी एक दिवस अगोदर लागले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटपटू हरभजन सिंग आज आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. 29 ऑक्टोबर 2015 रोजी जालंधर येथे दोघे विवाहबद्ध झाले होते. आता हे दोघे एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत.

 

लग्नाआधी 7 वर्षे होते रिलेशनशिपमध्ये.. 
हरभजन आणि गीता बसरा लग्नापूर्वी सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली सार्वजनिकरित्या दिली नव्हती. पण हरभजनचे क्रिकेटर्स मित्र तिला लग्नापूर्वीच भाभी म्हणून संबोधू लागले होते. लग्नापूर्वीपासूनच गीता हरभजनसाठी करवाचौथचे व्रत ठेवत आली आहे. लग्नाच्या आधी सहा वर्षांपासून गीता हे व्रत ठेवत आली.

 

30 ऑक्टोबर ऐवजी 29 ऑक्टोबरला झाले लग्न... 
खरं तर गीता-हरभजन यांच्या लग्नासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र 2015 मध्ये 30 ऑक्टोबर रोजी करवा चौथ आल्याने लग्न एक दिवस अगोदर ठेवण्यात आले होते. याचे कारण म्हणजे करवा चौथच्या दिवशी अनेकांना उपवास असतो. त्यामुळे लग्नात येणारे पाहुणे फूड एन्जॉय करु शकले नसते. म्हणून लग्नाची तारीख 29 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती.

 

रिसेप्शनला पंतप्रधानांची होती उपस्थिती...
लग्नात गीतासाठी झारखंडच्या अहिंसा सिल्कपासून बनवण्यात आलेला रेड कलरचा लहेंगा डिझायनर अर्चना कोचर यांनी तयार केला होता. हरभजनच्या पसंतीने हा वेडिंग ड्रेस तयार करण्यात आला होता. तर भच्चीसाठी अर्चना कोचर आणि राघवेंद्र राठौर यांनी ड्रेस डिझाइन केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे. रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती लावली होती. लग्नापूर्वी गीता आणि हरभजनसाठी मेंदी, संगीत, चुडा सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते.

 

पाहुयात, गीता आणि हरभजन यांच्या लग्नाच्याल तिस-या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...