आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थुकरट वाडीत येणार राणादा आणि पाठक बाई, नव्या रुपात बघायला मिळणार 'तुझ्यात जीव रंगला'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक जोशी आणि भाऊ कदम - Divya Marathi
हार्दिक जोशी आणि भाऊ कदम

एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. नुकतंच या कार्यक्रमाचं शेलिब्रेटी पॅटर्न हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं. यात विविध सेलिब्रेटी हजेरी लावताना पहायला मिळत आहेत. या शेलिब्रेटी पॅटर्नला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.


येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' आणि झी युवा वरील आगामी सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो 'युवा डान्सिंग क्वीन'ची टीम सज्ज होणार आहे. तसंच या भागात युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातील स्पर्धक म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री एक हटके परफॉर्मन्स सादर करणार आहेत. हार्दिक जोशी, अक्षया देवधर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या उपस्थितीत थुकरट वाडीच्या विनोदवीरांनी एकच कल्ला केला. 


येत्या आठवड्यात हे विनोदवीर 'तुझ्यात जीव रंगला' आणि 'नटरंग' चित्रपटावर आधारित एक विनोदी स्किट सादर करणार आहेत, ज्यामध्ये भाऊ कदम - राणा, श्रेया बुगडे - पाठक बाई यांची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे हास्यकल्लोळ होणार आणि हे विनोदवीर प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पडणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे ही धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी पाहायला विसरू नका.