Home | National | Gujarat | Hardik Loses 20 Kg weight Hunger Strike Gujrat government held meetings

हार्दिक पटेलच्या उपोषणाचा 11 वा दिवस, 20 किलो वजन घटले, तोडगा काढण्यासाठी गुजरात सरकारचे बैठक सत्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:35 PM IST

गुजरात सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली असून पाटीदार नेत्यांच्या बैठकांचे आयोजन सरकार करत आहे.

 • Hardik Loses 20 Kg weight Hunger Strike Gujrat government held meetings

  अहमदाबाद - हार्दिक पटेलच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस असून त्याचे जवळपास 20 किलो वजन घटल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे गुजरात सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली असून पाटीदार नेत्यांच्या बैठकांचे आयोजन सरकार करत आहे.


  पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्याने चर्चेत आलेल्या हार्दिक पटेलने 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पाटीदार समाजाला नोकरी आणि शिक्षणात ओबीसीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दीकने उपोषण सुरू केले आहे. गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे आता हार्दिकची तब्येत खालावत असल्याची माहिती आहे. हार्दिकचे वजन गेल्या 11 दिवसांत जवळपास 20 किलोने घटले असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे हार्दिकचे उपोषण लवकरात लवकर मागे घ्यावे यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलली आहे.

  मंगळवारी काही पाटीदार नेत्यांबरोबर सरकारच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत चर्चा केली. पाटीदार समाजाच्या सहा वेगवेगळ्या नेत्यांबरोबर बैठकीनंतर गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल म्हणाले की, हार्दिकचे उपोषण लवकरात लवकर मागे घ्यावे यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. या नेत्यांनी हार्दिक पटेलला भेटून यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन सरकारच्या प्रतिनिधींना दिले आहे.


  मंगळवारी घेतली दोन सिन्हांनी भेट
  दरम्यान हार्दिक पटेलला पाठिंबा दर्शवण्यासाठी मंगळवारी भाजपचे माजी केंद्री मंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखिल हार्दिकची भेट घेतली. शेतकऱ्यांसाठी हार्दिकचे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार असल्याचे सिन्हा यावेळी म्हणाले.

 • Hardik Loses 20 Kg weight Hunger Strike Gujrat government held meetings
 • Hardik Loses 20 Kg weight Hunger Strike Gujrat government held meetings

Trending