आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Hardik Pandya And KL Rahul Suspended From Team After Koffee With Karan Controversy 

कॉफी विथ करनच्या वादानंतर हार्दिक आणि राहुल टीममधून सस्पेंड, ऑस्ट्रेलियाहून परतणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हार्दिक पांड्याने करन जोहरच्या चॅट शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वर्तन केले होते. 
  • त्याने अनेक महिलांशी संबंध असल्याचे सांगितले होते. 

स्पोर्ट्स डेस्क - ओपनर लोकेश राहुल आणि ऑलराउंडर हार्दिक पांड्याला भारतीय टीममधून निलंबित करण्यात आले आहे. दोघांना ऑस्ट्रेलियाहून परत बोलावण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ते संघात असू शकणार नाहीत. हार्दिकने करन जोहरचा टीव्ही शो 'कॉफी विथ करन'मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. हार्दिकने शोमध्ये म्हटले होते की, त्याचे अनेक महिंशी संबंध आहेत. कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण टीमने या प्रकरणातून अंग काझडून घेतले आहे. ते त्यांचे वैयक्तिक प्रकरण असल्याचे कोहली म्हणाला. तर स्टार नेटवर्कने ‘कॉफी विथ करन’चा हा वादग्रस्त एपिसोड हटवला आहे. 

 
सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या प्रशासकांच्या समितीचे(सीओए) प्रमुख विनोद राय यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, चौकशी पूर्ण होईपर्यंत पांड्या आणि राहुल यांना निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय सीओएच्या सदस्या डायना एडुल्जी यांच्या प्रस्तावानंतर बदलण्यात घेण्यात आला. अॅडुल्जी यांनी दोन सामन्यांच्या बंदीची मागणी केली होती. पण बीसीसीआयच्या लीगल टीमच्या मते शोमधील वक्तव्ये कोड ऑफ कंडक्टच्या विरोधातील नाही. 

 
पांड्याने ट्वीटद्वारे मागितली माफी 
वादानंतर हार्दिकने ट्वीटद्वारे माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावतील याकडे लक्ष दिले नाही. शोच्या फॉरमॅटमुळे वाहावत गेल्याने असे वक्तव्य केले. पण कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे तो म्हणाला. 

बातम्या आणखी आहेत...