आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार-चार अॅक्ट्रेसेसना डेट केलेल्या क्रिकेटर हार्दिक पांड्याची झाली पोलखोल, राहुल म्हणाला- हा एकच लव्ह मेसेज कॉपी-पेस्ट करून सर्वांना पाठवतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करण जोहर (Karan Johar)च्या टॉक शो 'कॉफी विथ करण -6 (Koffee With Karan - 6) 

मध्ये पहिल्यांदा इंडियन क्रिकेट टीमचे दोन खेळाडू के.एल. राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेस्ट बनून आले होते. या एपिसोडमध्ये जेथे दोघांची बाँडिंग पाहायला मिळाली, तेथेच दोघांनीही आपल्या आयुष्यातील सीक्रेट्सही सार्वजनिक केले. केएल राहुलने शोमध्ये खुलासा केला की, बॉलीवुडमध्ये त्याची सर्वात मोठी क्रश मलाइका अरोरा (Malaika Arora) राहिलेली आहे. हो, केएलने चॅट शोमध्ये सांगितले की, मलाइकाला तो खूप पसंत करत होता, परंतु मध्ये जेव्हा अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आला अन् मलाइकाने अर्जुनसोबतची रिलेशनशिप पब्लिक केली तेव्हापासून केएलचा प्रेमभंग झाला आहे. तथापि, केएल राहुल सध्या अॅक्ट्रेस निधी अग्रवाल (Nidhi Agrawal) हिला डेट करत आहे. निधीने 'मुन्ना माइकल'मधून टाइगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत बॉलीवुडमध्ये एंट्री केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विशेष कमाल करू शकला नव्हता. निधी आणि राहुल दोघेही बंगळुरूचे रहिवासी आहेत. निधी बॉलीवुडमध्ये येण्यापूर्वी मॉडेल राहिलेली आहे, तर केएल राहुल टीम इंडियाच्या शानदार बॅट्समनपैकी एक आहे. 

 

अनेक तरुणांनी एकच लव्ह मेसेज चिकटवतो हार्दिक पांड्या....
- शोमध्ये केएल राहुलने मित्र हार्दिक पांड्याबद्दलही खुलासा केला की, तो अनेक जणींना एकच लव्ह मेसेज चिकटवून पाठवतो. तो सेम मेसेजच कॉपी पेस्ट करतो आणि त्यात काहीही बदल करत नाही.
- राहुलने सांगितल्यानुसार, "एक-दोन तरुणींनी मला ते मेसेज दाखवले की, हा तोच मेसेज आहे जो तिला पाठवला होता, आता मला पाठवलाय." यावर हार्दिक म्हणाला, "मला दोघींबद्दल एकसारखीच फीलिंग होती, म्हणून सेम मेसेज पाठवतो."
- क्रिकेटर हार्दिक पंड्याने अॅक्ट्रेस एली अवरामपासून वेगळा झाल्यानंतर उर्वशी रौतेला, ईशा गुप्ताला डेट केलेली आहे. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मागच्या काही महिन्यांपूर्वी एली आणि हार्दिकला सोबत पाहिले होते. एकदा एली, हार्दिकला एयरपोर्टवरही सोडण्यासाठी आली होती आणि मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना क्लिकही केले होते. तेव्हा एलीने आपला चेहरा लपवला होता.
- दुसरीकडे हार्दिकला उर्वशीसोबत मुंबईत क्वालिटी टाइम घालवताना पाहण्यात आले आहे. दोघेही मुंबईत गौतम सिंघानियांच्या एका पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीत हार्दिक हा उर्वशीसोबत फ्लर्ट करताना दिसला होता. 
- हार्दिक पंड्याचे नाव एखाद्या अॅक्ट्रेस वा मॉडलशी जोडल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याचे नाव परिणीती चोप्रासोबत जोडले होते. त्यापूर्वी क्रिकेट स्टार बनताच मॉडल लिसा शर्मासोबतही हार्दिकचे नाव जोडलेले होते.


जेव्हा मम्मीला राहुलच्या बॅगमध्ये आढळला होता कंडोम
- शोमध्ये केएल राहुलने सांगितले की, त्याच्या मम्मीला एकदा त्याच्या बॅगमध्ये कंडोम आढळला होता. के.एल. राहुलने सांगितले, "मी जेव्हा 18 वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या मम्मीला माझ्या पर्समध्ये कंडोम मिळाला होता. तिने ही गोष्ट पप्पांना सांगितली आणि मग ते माझ्यावर खूप ओरडले होते." 
- केएल राहुलने पुढे सांगितले की, "जेव्हा माझी मम्मी रात्री झोपण्यासाठी गेली तेव्हा पप्पा रूममध्ये आले. म्हणाले- मी खूप खुश आहे की, तू याचा वापर करतोयस. तू सेफ राहिलेच पाहिजे. मला माहिती आहे की, या वयात सर्वांसोबतच असे होते. पण तू सध्या तुझ्या क्रिकेटवरच फोकस केले पाहिजेस." दुसरीकडे, हार्दिक पांड्याने शोमध्ये सांगितले की, त्याचे कुटुंब याबाबत खूप ओपन मांइडेड आहे.

 

फक्त 9वीपर्यंतच शिकलाय हार्दिक पांड्या 
- शोमध्ये हार्दिक पांड्याने सांगितले की, त्याने फक्त 9वीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. हार्दिकने सांगितले की, तो दुसऱ्या इयत्तेपासून सतत नापास होत होता. हार्दिकच्या मते, तो एक्जाम पेपरमध्ये फक्त नाव आणि रोल नंबर लिहून परत यायचा. एवढेच नाही, अनेकदा तर तो आपला रोल नंबरही विसरला होता.
- हार्दिक सांगतो की, सध्या फक्त इंग्लिशच अशी भाषा आहे, जी तो थोडीबहुत लिहू आणि वाचू शकतो. मला हिंदी आणि गुजरातीही लिहिता-वाचता येत नाही. जर एखाद्याने हिंदीत माझे नाव लिहिले, तर तेही मला वाचता येणार नाही.

 

कोण सर्वोत्तम कॅप्टन विराट की धोनी?
- रॅपिड फायर राउंडमध्ये केएल राहुल आणि हार्दिक पांड्या दोघांना विचारण्यात आले की, एमएस धोनी आणि विराट कोहलीपैकी सर्वोत्तम कॅप्टन कोण आहे? यावर के.एल. राहुलने महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले, तर हार्दिक पांड्यानेही एमएस धोनीचेच नाव घेतले.
- हार्दिकने सांगितले की, मी धोनीच्याच कॅप्टनशिपमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय करणने विचारले की, सचिन तेंदुलकर आणि विराट कोहलीत उत्तम बॅटसमन कोण आहे? यावर दोघांनी विराट कोहलीचे नाव घेतले.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...