आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पंड्याचे चार दिवसांत दुसरे शतक, 55 चेंडूंत 158* धावा काढल्या

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पंड्याने चार दिवसांत दुसरे शतक झळकावले. डी.वाय. पाटील २० स्पर्धेत उपांत्य फेरीत शुक्रवारी पंड्याने ५५ चेंडूंत नाबाद १५८ धावा काढल्या. रिलायन्स वनकडून खेळाताना पंड्याने डावात २० षटकार व ६ चौकार लगावले. राहुल त्रिपाठीला एका षटकात त्याने चार षटकार ठोकले. यापूर्वी पंड्याने मंगळवारी कॅग विरुद्ध ३९ चेंडूंत १०९ धावा काढल्या होत्या. सलामीवीर शिखर धवन पुन्हा अपयशी ठरला. तो केवळ ३ धावांवर परतला. रिलायन्सने बीपीसीएल विरुद्ध ४ बाद २३८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बीपीसीएल टीम १५.४ षटकांत १३४ धावांवर ढेपाळली. रिलायन्सने हा सामना १०४ धावांनी जिंकला. पंड्याने एक विकेट देखील घेतली. 

पंड्याच्या आतापर्यंत 347 धावा 
पंड्याने आतापर्यंत ४ सामन्यांत ३४७ धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २३४ असा राहिला. त्याने ३८ षटकार व १६ चौकार खेचले. गोलंदाजी करताना पंड्याने १३ विकेट देखील घेतल्या. दुसरीकडे शिखर धवन पूर्णपणे अपयशी ठरला. तो चार सामन्यांत केवळ ६० धावा करू शकला. त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या ४३ राहिली. दुसरीकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर ४ सामन्यात एक बळी घेऊ शकला.