आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये केली हार्दिक पंड्यावर यशस्वी सर्जरी, पाठीच्या खालच्या भागात झाली होती दुखापत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स न्यूज - भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर हार्दिक पंड्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याच्या पाठीच्या खालच्या भागावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरी झाल्याच्या अवघ्या काही मिनिटानंतर हार्दिकने एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तसेच त्याच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल आभार मानले. आपण लवकरच बरे होऊन फील्डवर उतरू तोपर्यंत स्मरणात ठेवा असेही हार्दिक पंड्याने लिहिले आहे.


दक्षिण आफ्रिकेत टी-20 सिरीज खेळण्यासाठी हार्दिक पंड्याचे नाव जाहीर करण्यात आले होते. परंतु, टेस्ट सिरीजमधून त्याला बाहेर ठेवण्यात आले. याच दरम्यान त्याला पाठीच्या जुन्या आजाराचा सामना करावा लागला. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक दरम्यान त्याला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. त्यावरच उपचार करताना लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंड्या लवकरच परतण्याबद्दल आशावादी आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याला पूर्णपणे फिट घोषित करण्यासाठी तसेच टीममध्ये सामिल करून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. 

बातम्या आणखी आहेत...