आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल, हार्दिकची लोकसभा उमेदवारी संकटात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेला गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा झटका दिला. पाटीदार आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात हार्दिक दोषी ठरल्याचा निर्णय रोखण्यास न्यायालयाने नकार दिला. गुजरातमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे. उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी हार्दिककडे खूप कमी अवधी शिल्लक राहिला आहे.  

 

१२ मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक यांनी जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान मेहसाणाच्या विसनगरमध्ये दंगल भडकल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर हार्दिकला जामीन मिळाला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयाने हार्दिकची शिक्षा निलंबित केली होती. मात्र, दोषी ठरवण्याच्या आदेशावर स्थगित आणण्यास नकार दिला होता. हार्दिकच्या मागणीस विरोध करत राज्य सरकारने सांगितले होते की, हार्दिकविरुद्ध १७ एफआयआर दाखल आहेत. 

बातम्या आणखी आहेत...