Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Hardik Patel Loses 20 Kg In Hunger Strike know the reasons

उपोषणामुळे हार्दिकचे वजन 20 किलो झाले कमी, उपास न करताही कमी करू शकता वजन

हेल्थ डेस्क | Update - Sep 05, 2018, 03:04 PM IST

पाटीदार समाजाच्या आरक्षण मागणीसाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या हार्दिक पटेलचे वजन 20 किलो कमी झाले आहे.

 • Hardik Patel Loses 20 Kg In Hunger Strike know the reasons

  पाटीदार समाजाच्या आरक्षण मागणीसाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या हार्दिक पटेलचे वजन 20 किलो कमी झाले आहे. डॉक्टरांनी हार्दिकला उपचाराचा सल्ला दिला आहे. हार्दिक पटेलला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न केल्यास त्याच्या शरीराचे काही अवयव डॅमेजही होऊ शकतात. उपोषणामुळे हार्दिकचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. आज आम्ही तुम्हाला वजन कशामुळे कमी होते आणि दैनंदिन आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते याविषयीची खास माहिती देत आहोत.


  यामुळे वाढते किंवा कमी होते वजन
  - निरोगी व्यक्तीचे वजन जेवणाचे प्रमाणात आणि व्यक्तीची सक्रियता, कार्य, मेहनतीनुसार राहते. सामान्यतः व्यक्तीच्या कार्यानुसार त्याची ऊर्जा (कॅलरी)ची मात्रा निर्धारित होते.
  - जास्त मेहनत किंवा व्यायाम केल्याने भूक वाढते. शरीराला पर्याप्त कॅलरी मिळत राहिल्यास वजन सामान्य राहते. परंतु सक्रियता आणि कॅलरी यांचे संतुलन बिघडले तर वजन कमी होते किंवा वाढते. शरीराचे 1 पौंड वजन कमी होण्याचा किंवा वाढण्याचा अर्थ शरीरात 3,500 कॅलरीची कमतरता किंवा वाढ झाली आहे.


  जाणून घ्या, व्यायाम न करता वजन कमी करण्याचे उपाय
  वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, ज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तुम्हालाही कमी कष्टामध्ये वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल.


  - जास्त कार्बोहायेड्रेट असणार्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते.


  - फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी फायदेशीर ठरते.


  - दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.


  पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, वजन कमी करण्याचे आणखी काही खास अचूक उपाय...

 • Hardik Patel Loses 20 Kg In Hunger Strike know the reasons

  - पपई नियमित खा. पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते.


  - दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही.


  - कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते.

 • Hardik Patel Loses 20 Kg In Hunger Strike know the reasons

  - आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल.


  - एक चमचा पुदिन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास वजन कमी होते.


  - लाल तिखटातील कॅप्सासिन नावाचा घटक हा वेदनाशामक म्हणूनही फायदेशीर ठरतो. दमा, सर्दी, ताप या आजारात हा पदार्थ पूरक ठरतो. एवढेच नाही, तर वजन कमी करण्यासाठी देखील त्याचा फायदा होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे.

 • Hardik Patel Loses 20 Kg In Hunger Strike know the reasons

  - गाजराचे भरपूर सेवन करावे कारण आधुनिक विज्ञानानेही गाजर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मान्य केले आहे.


  - मध एक काम्पलेक्स साखर आहे, जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खुप फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने फायदा होतो.


  - हिरडा किंवा बेहडा यांचे चुर्ण एक-एक चमचा 50 ग्रॅम पडवळाच्या रसासोबत (1 ग्लास) मिसळून घेतल्याने वजन खुप लवकर कमी होते आणि थकवाही निघून जातो.

Trending