आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी गृहमंत्री हरेन पांड्या हत्याकांडात सुप्रीम कोर्टने 12 आरोपीना ठरवले दोषी, 2003 मध्ये गोळी मारून झाली होती हत्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातचे माजी गृह मंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज(शुक्रवार) खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवून 12 आरोपींन दोषी ठरवले आहे. 2011 मध्ये गुजरात हायकोर्टाने सगळ्या आरोपींची सुटका केली होती, या निर्णयाविरूद्ध सीबीआय आणि गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.


26 मार्च 2003 ला हरेन पांड्या सकाळी फिरण्यासाठी अहमदाबादच्या लॉ गार्डन परिसरात गेले असता, त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस ट्रायल कोर्टाने दहशदवाद विरोधी कायद्याअंतर्गत दोषींना पाच वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपींच्या आपीलनंतर 29 ऑगस्ट 2011 ला गुजरात हायकोर्टने सेशन कोर्टाच्या निर्णयाला रद्द करून सर्व आरोपींची सुटका केली होती. सीबीआयने 2012 मध्ये हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.


पुन्हा चौकशीची मागणी रद्द
जस्टिस अरुण मिश्राच्या बँचने एनजीओ सीपीआयएलची ती याचिका रद्द केली, ज्यात कोर्टाच्या देखरेखीत या प्रकरणाची परत एकदा चौकशी करण्याची मागणी केली होी. न्यायालयने यावर परत चौकशी करण्यासाठी याचिका दाखल करण्यावरून एनजीओवर 50 हजार रुपयांचा दंड लावला होता आणि यावर आता पुढे कोणतीच चौकशी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...