Home | Business | Business Special | Hari Krishna Exports Pvt Ltd Diamond manufacturing and exporting company employee benefits

कंपनी असावी तर अशी...कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 5 दिवस फ्री जेवण, दिवाळीला 20 दिवस सुट्टी; मृत्यूनंतर 1 Cr रू, दिवाळी बोनसमध्ये घर, कार, ज्वेलरीसारखे गिफ्ट आणि बरेच काही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 03:25 PM IST

या कंपनीत जॉब करण्यासाठी अशाप्रकारे करा अप्लाय

 • Hari Krishna Exports Pvt Ltd Diamond manufacturing and exporting company employee benefits

  न्यूज डेस्क - आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला धमाकेदार बोनस देणाऱ्या कंपनीच्या मालकानी आयुष्याचे 57 वर्ष पूर्ण केले. आम्ही बोलत आहोत सूरतच्या हरे कृष्ण डायमंड कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांच्याविषयी. आपल्या कर्मचाऱ्यांना घर, कार आणि ज्वेलरी दिल्यानंतर ही कंपनी चर्चेत आली होती. कंपनीने मागील दिवाळीला 600 कर्मचाऱ्यांना कार आणि 1100 कर्मचाऱ्यांना घर, बँक एफडी आणि दागिने गिफ्ट केले होते. यामुळे आता भारतातील प्रत्येक व्यक्ती या कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहत आहे. अशातच आम्ही तुम्हाला या कंपनीत जॉबसाठी कशाप्रकारे अप्लाय करावे याबद्दल सांगत आहोत.


  असे करा अप्लाय ....

  येथे काम करण्यासाठी तुमच्याकडे कंपनीत काम करणाऱ्या 8 हजार कर्मचाऱ्यांपैकी एकाचा रेफरेंस असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर रेफरेंस नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत. कंपनीत काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा रेफरेंस असल्यास, अॅप्लीकंटकडून एक फॉर्म भरून घेण्यात येतो. यामध्ये त्याची सर्व माहिती भरावी लागते. या फॉर्मच्या आधारावरच मुलाखत घेण्यात येते. तर मुंबई येथील एक्सपोर्ट युनिटसाठी वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकता. येथे करिअरच्या कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन Resume पाठवावा लागतो. कंपनीकडे तब्बल 3 हजार अॅडव्हान्स Resume आहेत.

  > किती मिळणार सॅलरी
  कंपनी रेवेन्यू मोडवर काम करते. अशात एखाद्या कर्मचाऱ्याचे काम चांगले असेल तर त्याला त्याचा नफा मिळतो. अशाप्रकारे तो व्यक्ती एक लाख रूपयांपर्यंत कमाई करू शकतो. येथे असे कर्मचारी आहेत जे 5 लाख रूपये महिना कमाई करतात. कर्मचाऱ्यांची शिफ्ट सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत असते. कंपनीचा कर्मचाऱ्यांचा जॉब सोडण्याचा रेशिओ 10% पेक्षा कमी आहे.

  > कंपनीत मिळणाऱ्या सुविधा

  1. कर्मचाऱ्याला दरवर्षी 1 लाख रूपयाचे मेडिकल आणि 1 कोटी रूपयांचा डेथ इंशुरंन्स मिळतो.
  2. दरवर्षी दोन फ्री युनिफॉर्म, हेल्टेम मिळते. कर्मचाऱ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध आहे.
  3. क्रिकेट ग्राउंड, स्विमिंग पूल, जिम, योगा सेशन इत्यादी सुविधा देण्यात येतात.
  4. कर्मचाऱ्यांच्या मुलांची शालेय फी सोबत वह्या पुस्तकांचा खर्च कंपनी देते.
  5. सोमवार ते शुक्रवार फ्री जेवण मिळते. तर शनिवारी टिफिन डे असतो.
  6. दर 3 वर्षाला कर्मचाऱ्यांचा पालकांना हरिद्वार दर्शन करवण्यात येते. यामध्ये 1 हजार पालकांचा सहभाग असतो.
  7. नवरात्री, होळी समवेत सर्व सणांना सुट्टी असते. दिवाळीला सर्वांना 20 दिवसांची सुट्टी देण्यात येते.
  8. उन्हाळी सुट्टीसाठी देखील 10 दिवसांची सुट्टी देण्यात येते.

  सावजी ढोलकिया यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा........

 • Hari Krishna Exports Pvt Ltd Diamond manufacturing and exporting company employee benefits

  सावजी ढोलकिया यांच्या विषयी थोडी माहिती


  वयाच्या 13 व्या वर्षी सोडली शाळा
  सावजी ढोलकीया गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावातील रहिवासी आहेत. यांनी वयाच्या 13 व्या वर्षीच शाळा सोडून सुरत येथे आपल्या काकाच्या डायमंड बिझनेसमध्ये काम करू लागले.


   

  कर्ज घेऊन सुरु केला हिऱ्यांचा व्यापार 
  आपल्या काकांकडून कर्ज घेऊन यांनी डायमंड बिझनेस सुरु केला आणि मेहनतीच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचले.


   

  हरी कृष्णा एक्स्पोर्ट्सची स्थापना 
  डायमंड पॉलिशिंगमध्ये 10 वर्ष कठोर मेहनत केल्यानंतर ढोलकीया यांनी वर्ष 1991 मध्ये हरी कृष्णा एक्स्पोर्टची स्थपणा केली. यावेळी कंपनीचा सेल नाममात्र होता.

   

   

  2014 मध्ये बंपर वाढ
  मार्च 2014 पर्यंत कंपनीचा टर्नओव्हर 4 अब्ज कोटींपर्यंत गेला. कंपनीचा टर्नओव्हर 2013 च्या तुलनेत 2014 मध्ये 104 टक्के वाढला.


   

  6 हजारपेक्षा जास्त कर्मचारी 
  सध्या सावजी ढोलकीया यांच्या कंपनीत 6 हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. हे डायमंडचे दागिने तयार करून विदेशात निर्यात करतात. हे काम त्यांच्या दोन कंपन्या एच.के. डिझाइन्स आणि यूनिटी जेवेल्स करतात.


   

  देशामध्ये 6,500 रिटेल आउटलेट्स
  एच. के. जेवेल्स प्रायव्हेट ली. च्या माध्यमातून देशभरात हा बिझनेस चालतो. यांचा किसना डायमंड ज्वेलरी ब्रँड 6,500 रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून संपूर्ण देशात उपलब्ध आहे.


   

  50 देशांमध्ये निर्यात
  सावजी यांची कंपनी जगभरात 50 पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करते. यामध्ये अमेरिका, बेल्जीयम, संयुक्त अरब, युएई, हॉंगकॉंग, चीन यासारख्या देशांमध्ये त्यांच्या सहायक कंपन्या आहेत.

   

   

  पुढे वाचा...यावर्षीपासून देत आहेत कर्मचाऱ्यांना भेट 

 • Hari Krishna Exports Pvt Ltd Diamond manufacturing and exporting company employee benefits

  2011 पासून प्रत्येक वर्षी देतात खास भेट 
  ढोलकीया 2011 पासून प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना अशाचप्रकारे दिवाळी बोनस देतात. 2015 मध्ये यांच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये 491 कार आणि 200 फ्लॅट दिले होते. 2014 मध्येसुद्धा कंपनीने कर्मचाऱयांना इन्सेन्टिव्ह स्वरूपात 50 कोटी रुपये वाटले होते.


   

  सिद्धांताचे पक्के 
  अब्जाधीश असूनही त्यांनी स्वतःचा मुलगा द्रव्यला पैशांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी केवळ 7 हजार रुपये देऊन कोची शहरात रोजीरोटी कमावण्यासाठी पाठवले होते. एमबीए केलेल्या मुलाला आपल्या पायावर उभे राहण्याची शिकवण देण्यासाठी त्यांनी असे केले होते.

   


  प्रेमाने सर्वजण म्हणतात 'काका'
  सावजी डायमंड इंडस्ट्री आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये  'काका' नावाने प्रसिद्ध आहेत.

   

   

  डायमंड बिझनेससाठी प्रसिद्ध आहे सुरत 
  सध्या सुरतमध्ये 2,500 पेक्षा जास्त फॅक्ट्रींमध्ये हिरा कटिंग आणि पॉलिशिंगच्या कामामध्ये जवळपास चार लाख लोक काम करतात.
   

Trending