आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या अटीमुळे हरिभाऊ बागडेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह, हरिभाऊंनी नुकतीच पंचाहत्तरी गाठली आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय जनता पक्षामध्ये सत्तर वर्षे पार केलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच अनेक वयस्कर उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागणार आहे. यातच आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा नंबर लागण्याची शक्यता आहे. हरिभाऊ बागडें यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी गाठली असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भाजपने लोकसभा निवडणुकीत वयाचा निकष लावत अनेक वयस्कर खासदारांना तिकीट नाकारले होते. विधानसभेलाही हे होणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत 75 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिले जाणार नसल्याचे पाटलांनी स्पष्ट केले होते. बागडे औरंगाबादमधील फुलंब्री मतदारसंघातून भाजप आमदार आहेत.बागडेंच्या उमेदवारीवरून बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे बागडेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे सुर उमटत आहेत. दुसरीकडे, हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनेकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बागडे यांच्या उमेदवारी बाबत पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.मागील काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे राज्यभर वाहू लागले आहेत. यातच राज्यातील तीसपेक्षा अधिक आमदारांनी राजीनामा दिले आहेत. हे सर्व राजीनामे विधानसभा अध्यक्ष या नात्याने बागडेंनी स्वीकारले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक राजीनामे स्वीकारण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...