आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितालिका 12 सप्टेंबरला : या उपायांनी पूर्ण होऊ शकते प्रत्येक इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत केले जाते. या दिवशी मुख्यतः देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते. या व्रताने अविवाहित मुलींना मनासारखा पती मिळतो आणि विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. या वर्षी हे व्रत 12 सप्टेंबर, बुधवारी आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास देवी पार्वती तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकते...


1. हरितालिकेच्या दिवशी 11 नववधूंना सौभाग्याचे सामान उदा. सिंदूर, मेंदी, काजल, बांगड्या, लाल ओढणी इ. भेट द्यावे.


2. हरितालिकेच्या दिवशी ब्राह्मण कुमारिकेला तिचे आवडीचे कपडे घेऊन द्यावेत तसेच एखादी भेट वस्तूही द्यावी.


3. या दिवशी पती-पत्नीने सकाळी लवकर उठून स्नान करून एखाद्या शिव-पार्वतीच्या मंदिरात जावे आणि लाल फुल अर्पण करावे.


4. हरितालिकेच्या दिवशी देवी पार्वतीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम कायम राहील.


5. देवी पार्वतीला लाल रंगाची ओढणी, लाल बांगड्या, मेंदी, गुलाबाचे फुल इ. सौभाग्य सामग्री अर्पण करावी.

बातम्या आणखी आहेत...