आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितालिका : भगवान शिव देवी पार्वती पूजेमध्ये अर्पण करावीत आंबा आणि बेलाची पाने, पूर्ण होतील सर्व इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत केले जाते. यावेळी हे व्रत 12 सप्टेंबरला बुधवारी आहे. विधिव्रत हरितालिका व्रत केल्यास अविवाहित मुलीला मनासारखा पती प्राप्त होतो तर विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. अशाप्रकारे करा हे व्रत...


सकाळी नदीवर जाऊन तेथील वाळू आणावी. या वाळूपासून शिवलिंग तयार करावे. शिवलिंगाला दूध, पाणी यांचा अभिषेक करून हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध चंदन वाहून पूजा करावी. त्यानंतर बेल आणि विविध वनस्पती अर्पण कराव्यात. यात आंबा, औदुंबर, पिंपळ, पळस, आघाडा, केवडा, दुर्वा यांच्यासोबत अनेक फुलांच्या फळांच्या वनस्पती वाहिल्या जातात. फुलामध्ये धोत्र्याच्या फुलाला विशेष मान आहे. फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचे पुष्प भगवान शंकरांना अतिप्रिय असते. यानंतर हरितालिकेची कथा वाचावी आणि हरितालिका, शंकराची आरती करून रात्री जागरण करावे. दुसर्‍या दिवशी दहीभाताचा नैवेद्य दाखूवन उपवास सोडावा. महादेव-पार्वतीच्या पूजेचे विसर्जन करावे.


पार्वतीची पूजा करताना पुढील मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ उमायै नम:, ऊँ पार्वत्यै नम:, ऊँ जगद्धात्र्यै नम:, ऊँ जगत्प्रतिष्ठïयै नम:, ऊँ शांतिरूपिण्यै नम:, ऊँ शिवायै नम:


महादेवाची उपासना करताना या मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ हराय नम:, ऊँ महेश्वराय नम:, ऊँ शम्भवे नम:, ऊँ शूलपाणये नम:, ऊँ पिनाकवृषे नम:, ऊँ शिवाय नम:, ऊँ पशुपतये नम:, ऊँ महादेवाय नम:


हा उपाय करावा 
हरितालिका तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीला दुधात केशर मिसळून अभिषेक करावा. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. अविवाहित मुलींनी हा उपाय केल्यास मनासारखा पती मिळतो.

बातम्या आणखी आहेत...