आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज या 4 पैकी कोणत्याही 1 मंत्राचा जप केल्याने पूर्ण होऊ शकते प्रत्येक इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (12 सप्टेंबर, बुधवार) हरितालिका आहे. या दिवशी महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार या दिवशी देवी पार्वतीच्या काही विशेष मंत्राचा जप केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. खालीलपैकी कोणत्याही एक मंत्राचा जप करावा...


मंत्र
1. ऊं साम्ब शिवाय नम:
2. ऊं पार्वत्यै नम:
3. उं उमामहेश्वराभ्यां नम:
4. ऊं गौरये नम:


मंत्र जप विधी
- हरितालिका व्रताच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर शिव आणि पार्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.
- त्यानंतर विधिव्रतपणे पूजन सामग्री अर्पण करावी आणि महादेवाला बिल्वपत्र तसेच देवी पार्वतीला लाल फुल अर्पण करावे.
- शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हा दिवा मंत्र जप पूर्ण होईपर्यंत चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
- त्यानंतर रुद्राक्षाच्या माळेने वरील मंत्रांपैकी कोणत्याही एक मंत्राचा कमीत कमी एक माळ म्हणजे 108 वेळेस जप करावा.
- सकाळी वेळ नसल्यास संध्याकाळी स्नान करूनही या मंत्राचा जप करू शकता.
- या मंत्र जपाने देवी पार्वती प्रसन्न होते आणि आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

बातम्या आणखी आहेत...