आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज संध्याकाळी शिव-पार्वती मंदिरात लावावेत 11 दिवे, मिळू शकतो मनासारखा जोडीदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (12 सप्टेंबर, बुधवार) भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी आहे. महिला या दिवशी हरितालिका व्रत करतात. या व्रतामध्ये मुख्यतः देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास अविवाहित मुलींना मनासारखा पती मिळू शकतो. विवाहित महिलांनी हे उपाय केल्यास घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहील. येथे जाणून घ्या, उपाय...


1. आज संध्याकाळी शिव-पार्वती मंदिरात जाऊन पूजा करावी आणि शुद्ध तुपाचे 11 दिवे लावावेत. या उपायाने अविवाहित मुलींना मनासारखा जोडीदार मिळू शकतो.


2. अविवाहित ब्राह्मण मुलीला तिच्या आवडीचे वस्त्र घेऊन द्यावेत. सोबतच एखादी भेटवस्तूही द्यावी.


3. देवी पार्वतीला 11 हळकुंड अर्पण केल्यास मुलीच्या विवाहाचे योग जुळून येऊ शकतात.


4. शिव-पार्वतीचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम कायम राहते.


5. या दिवशी पती-पत्नीने सकाळी लवकर उठून स्नान करून शिव मंदिरात जावे आणि लाल फुल अर्पण करावे.


6. आज पूजा झाल्यानंतर देवी पार्वतीला खीर नैवेद्य दाखवावी.

बातम्या आणखी आहेत...