आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाला - हरियाणाच्या अंबाला येथील जुन्या भाजीमंडीमध्ये मंदिराबाहेर दोन वर्षांपासून भीक मागणारा युवक करोडपती निघाला. या युवक आझमगड येथील रहिवासी आहे. त्याचे खरे नाव धनंजय ठाकुर आहे. मात्र मंडीतील लोक त्याला जटाधारी म्हणत होते. धनंजयचे वडील राधेश्याम सिंग कोलकातातील एका मोठ्या कंपीत एचआर आहे. शुक्रवारी धनंजयची लहान बहीण नेहा सिंग त्याला घेण्यासाठी पोहोचली तेव्हा लाडक्या भावापासून वेगळे झाल्यापासून ते तो मिळण्यापर्यंतची कहाणी उलगडली.
गुरुवारी धनंजयच्या पायातील रक्तस्त्राव पाहून गीता गोपाल संस्थेचे सदस्य साहिलने त्याला उपचारासाठी जवळ बोलावले. यादरम्यान त्याच्याशी विचारपूस केली की, तू कुठून आला आहेस. मानसिकस्थिती ठीक नसल्यामुळे तो गावाचे नाव सांगू शकला नाही. मात्र थोडे आठवल्यानंतर त्याने एक मोबाइल नंबर सांगितला. या नंबरवर कॉल केला असता मुलाचे काका शिशुपाल यांनी फोन उचलला. काकांनी युवकाचे नाव धनंजय ऊर्फ धर्मेंद्र सांगितले. धनंजय दोन वर्षांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. शुक्रवारी धनंजयची बहीण नेहा त्याला घेण्यासाठी आली. तो मंदिराजवळ बसलेला होता. दाढी आणि केस वाढलेले होते. बहिणीला पाहताच धनंजयने तिला ओळखले. बहीण धनंजयला म्हणाली, दादा, फोन नंबर माहीत होता तर मग दोन वर्षांपूर्वी फोन का करू शकत नव्हता?
बरेच शोधले पण काही उपयोग झाला नाही, अखेर कुटुंबीयांनी आशा सोडली
नेहाने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, एकुलता एक भाऊ असल्याने धनंजय कुटुंबाचा लाडका होता आणि हट्टी सुद्धा होता. त्याने ग्रॅज्युएशन केले आहे. तो व्यसनाधीन झाला होता. यामुळे त्याची मनःस्थिती बिघडत गेली आणि तो एक दिवस घरातून निघून गेला. कुटुंबाने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो सापडला नाही. त्यामुळे आता घरच्यांनी आशा देखील सोडली होती. भाऊ मिळावा यासाठी बहीण गुरुवारचे उपवास करत होती. योगायोग म्हणजे गुरुवारीच ईश्वराने बहिणीला भावाची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.