आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरजिंदर रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी चालवतात ऑटो रुग्णवाहिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत राहणारे हरजिंदरसिंग (वय ७६ वर्षे) “ऑटो रुग्णवाहिका” चालवतात. दिल्लीत रस्ते अपघातात जखमी झालेल्यांचे लोक व्हिडिओ तयार करत असतात. परंतु हरजिंदर जखमींवर प्रथमोपचार करत असतात. अपघातग्रस्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या ऑटोला रुग्णवाहिकेत बदलले आहे. ते केवळ प्रथमोपचारच करतात असे नव्हे, तर जखमींना रुग्णालयात नेण्यास मदतही करतात.


त्याच्यावर लवकर उपचार कसे सुुरू होतील याकडेही लक्ष देतात. हरजिंदर म्हणाले, गेल्या तीन महिन्यांत १०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. सरासरी रोज एका अपघातग्रस्ताला मदत करतो. मी वाहतूक वॉर्डन म्हणून जखमीची मदत करतो. मी अनेक अपघात पाहिले आहेत. यामुळे ऑटो रुग्णवाहिकेद्वारे लोकांची मदत करतो, असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...