आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरात महामारीसारखा पसरला आहे HIV/AIDS, अशा अवस्थेत दिसतात पीडित रुग्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिजुआना - संपूर्ण जगामध्ये 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स-डे दिवस पाळला जात आहे. यावेळी जगभरामध्ये HIV व्हायरसपासून बचावाच्या पद्धती आणि आजारांबाबत जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. एकिकडे हा आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान बनला आहे, तर त्याचवेळी जगातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांना याची लागण होत आहे. आज आम्ही तुम्हाला मॅक्सिकोच्या अशा एका शहराबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी एड्सच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.  


फोटोतून जाणवते भयावह वास्तव 
- काही काळापूर्वी मॅक्सिकोच्या 'तिजुआना' शहराचे काही फोटो जारी कऱण्यात आले होते. ते याठिकाणच्या एचआयव्ही संक्रमित रुग्णांची अवस्था दाखवत होते. मॅक्सिकोचे हे शहर इंडस्ट्रीयल आणि फायनान्शिअल सेंटर म्हणूनही ओळखले जाते. फोटोग्राफर मॅकोम लिंटन आणि पत्रकार जॉन कोहेन यांनी दीर्घकाळ तिजुआनामध्ये राहून येथील एचआयव्हीग्रस्त लोकांचे फोटो क्लिक केले होते. 

 

लोकांना अमेरिकेहून पाठवतात तिजुआनाला 
हे फोटो 'Tomorrow Is a Long Time' नावाच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार मुताबिक, तिजुआनाच्या एचआयव्ही पीडितांमध्ये अमेरिकेत राहण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नसलेल्यांची संख्या अधिक आहे. अशी कागदपत्रे नसतील किंवा काही गुन्हा केला तर त्यांना थेट मेक्सिकोला डिपोर्ट करण्यात येते. या लोकांची अवस्था अत्यंत वाईट असते. त्यांच्याकडे घर नसते. ड्रग्ज घेऊ लागतात आणि सेक्स वर्कमध्ये त्यांना ढकलले जाते. येथे असे अनेक लोक आहेत ज्यांचा तिजुआनाशी यापूर्वी काहीही संबंध राहिलेला नाही. तसेच ते दीर्घकाळ अमेरिकेत राहिले आहेत. 


एचआयव्ही पीडितांची संख्या तीनपट अधिक 
तिजुआनाची लोकसंख्या 16 लाख आहे. संपूर्ण मेक्सिकोतील एचआयव्ही ग्रस्त असलेल्यांच्या संख्येच्या तुलनेत येथील एचआयव्ही बाधीत रुग्णांची संख्या तीनपट अधिक आहे. काही सर्वेनुसार एकूण एचआयव्ही पीडितांमध्ये फक्त 11 टक्के लोकांनाच एचआयव्ही उपचारांचा खर्च करणे शक्य होते. अनेक रिपोर्ट्समध्ये तिजुआनामध्ये आचआयव्ही महामारीप्रमाणे पसरल्याचे सांगण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...