आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सीरीजमध्ये काम काम करू इच्छित नाही डॅनियल रेडक्लिफ, म्हणाला - जुन्या कास्टशिवायही चित्रपट चांगले प्रदर्शन करत आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : 10 वर्षांपर्यंत हॅरी पॉटर सीरीजचा भाग असलेला डॅनियल रेडक्लिफ ‘फँटास्टिक बीस्ट अँड वेअर टू फाइंड देम’ मध्ये काम करू इच्छित नाही. डॅनियल म्हणाला की, नवे चित्रपट जुन्या कास्टविनाही चांगले काम करत आहे. 'फँटास्टिक बीस्ट', हॅरी पॉटर सीरीजचा प्रीक्वल आहे. याच चित्रपटाच्या लेखिका बी जेके रोलिंग याच आहेत. 

डॅनियलने हॅरी म्हणून चित्रपटात परतण्याबद्दल सांगितले की, मला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणायला आवडत नाही, पण मला नाही वाटत मी सीरीजमध्ये परतेल. माझ्या मते ते चित्रपट आता गेले आहेत आणि आमच्याविनाही चांगले प्रदर्शन करत आहेत. 

अभिनेत्याने सांगितले की, असे नाहीये की, मी कधी कोणत्या फ्रॅन्चायसीचा भाग बनणार नाही. सध्या जी फ्लेक्सिबिलिटी माझ्या करियरसोबत आहे ती मला आवडते. तो म्हणाला की, मला अशा परिस्थितीत अडकायचे नाही जिथे, एका सीरीजमध्ये सामील होऊन अनेक वर्षांसाठी साइन व्हावे.

10 वर्षे साकारली हॅरीची भूमिका... 

‘हॅरी पॉटर’ आठ चित्रपटांची इंग्रजी सीरीज आहे, ज्यामध्ये डॅनियलने लीड रोल प्ले केला होता. त्याच्याव्यतिरिक्त या सीरीजमध्ये एमा वॉटसन, रूपर्ट ग्रिंट, बॉनी राइट, रिचर्ड हॅरिस, मॅगी स्मिथ यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सीरीजचा पहिला चित्रपट ‘हॅरी पॉटर अँड द सॉसरस स्टोन’ ला तीन कॅटॅगरीमध्ये ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते. 

बातम्या आणखी आहेत...