आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Harsh Winter Prompts J K Admin To Shift 34 Political Prisoners, Mehbooba's Daughter Claims Manhandling With Them

नजरकैदेत असलेल्या नेत्यांना मारहाण! महबूबा मुफ्ती यांच्या मुलीचा खळबळजनक आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या 34 नेत्यांना कडाक्याच्या थंडीमुळे इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. श्रीनगरच्या एका हॉटेलातून रविवारी सरकारी गेस्ट हाउसमध्ये शिफ्ट करण्यात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी 5 ऑगस्ट रोजी काश्मीरातून कलम 370 हटवताना त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये काश्मीरचे माजी मंत्री आणि आमदार सुद्धा सामिल आहेत. दरम्यान, महबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी ट्विट करत आरोप केला, की पोलिसांनी शिफ्टिंग करत असताना या नेत्यांना मारहाण केली. यामध्ये सज्जाद लोन, शाह फैसल आणि वाहिद पारा यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले असे त्या म्हणाल्या आहेत. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

चेकिंग करताना मारहाण झाल्याचा आरोप


सज्जाद लोन यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या आरोपानुसार, सज्जाद लोन यांची चेकिंग करण्याच्या नावे त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. तसेच मारहाणही करण्यात आली. इल्तिजा यांनी लिहिले, "हे सगळेच लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी आहेत. तरीही त्यांना इतकी हीन वागणूक दिली जात आहे. हे तेच वाहिद पारा आहेत ज्यांचे एकेकाळी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले होते. आता एवढा अपमान का? लोक प्रतिनिधींना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यांचे काय होत असावे याचा विचार करावा." असे सवाल इल्तिजा यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...