आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हर्षदा खानविलकर म्हणाल्या- मी परत येतेय…, या मालिकेतून नव्या रुपात करत आहेत कमबॅक  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्षदा खानविलकर - Divya Marathi
हर्षदा खानविलकर

छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'पुढचं पाऊल' या मालिकेत आक्कासाहेब ही व्यक्तिरेखा साकारणा-या प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर आता नवीन मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर ३० ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत हर्षदा झळकणार आहेत. सौंदर्या इनामदार हे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून हर्षदा यांचा निराळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगतना हर्षदा म्हणाल्या, ‘या भूमिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. पुढचं पाऊल या मालिकेने माझं विश्व बदललं. ३ वर्षांहून अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं नव्याने आयुष्य सुरु होतंय असं म्हटलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी सौंदर्या. पुढचं पाऊलच्या आक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे. याआधी 'पुढचं पाऊल' या मालिकेमधील हर्षदा यांच्या आक्कासाहेब या लूकची बरीच चर्चा होती. तमाम स्त्री वर्गात आक्कासाहेबांच्या साड्या, त्यांचे दागिने आणि खास करुन त्यांचे गजरे प्रसिद्ध होते. ‘रंग माझा वेगळा’ या आगामी मालिकेमधील त्यांचा लूकही हटके असणार आहे. सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन रंग माझा वेगळा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी मालिका ३० ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...