आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Harshavardhan Jadhav's Big Announcement, His Shivswarajya Bahujan Party Will Contest 6 Assembly Seats In The District

शिवस्वराज्य बहुजन पक्ष जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 जागा लढवणार, हर्षवर्धन जाधव यांची मोठी घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमदारकीचा राजीनामा देणारा पहिला आमदार आणि नुकतंच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंड ठोकून प्रकाश झोतात आलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला पक्ष आगामी विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. हर्षवर्धन जाधव यांचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष आगामी विधानसभेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व 6 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हर्षवर्धन जाधवांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्यावेळी शिवसेना नेतृत्वाशी वाद झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद मधून अपक्ष निवडणूक लढवली, त्यांच्या बंडखोरीमुळे 25 वर्षे शिवसेनेकडे असणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघात एमआयएमला विजय मिळाला. या निवडणुकीत जाधव यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त मतदान मिळवले, ज्याचा फटका शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना बसला होता. या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जरी झाला असला, तरी त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष आकर्षित केले. त्यांच्या या धाडसामुळे जिल्ह्यात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. याच लोकप्रियतेच्या जोरावर आता विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार ते निवडणुकीत उतरवणार आहेत. योग्य उमेदवार मिळाल्यास औरंगाबाद शहरातील तीनही जागा लढवणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबादमधील पश्चिम मतदारसंघावर त्यांचे जास्त लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...