आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंवर टीका करतानाह हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली, शिवसेनेकडून होत आहे जोरदार विरोध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चादरम्यान राजीनामा देऊन राज्यभर चर्चेत आलेले माजी आमदार मनसे आणि शिवसेनेचे आमदार आणि कन्नड मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. "जर शिवसेनेला मुस्लिमांचे वावडे आहे, तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले?", असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंव अश्लील विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.  
"कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली." अशी टीका उद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना हर्षवर्धन जाधवांची टीका करताना जीभ घसरली. सभेत बोलताना त्यांनी अश्लील भाषेत टीका केली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे.हर्षवर्धन जाधव हे नीच आहेत- चंद्रकांत खैरे
 
"हर्षवर्धन जाधव यांनी भगवा झेंडा खाली खेचला आणि त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला, मग उद्धव ठाकरेंचे काय चुकीले. एमआयएमसोबत मैत्री करुन हर्षवर्धनने शिवसेनेला हरवण्याचे काम केले. हा किती नीच आहे. हे इथल्या मतदारांना माहिती नव्हते. आता त्यांना माहित पडले असेल. हर्षवर्धन यांनी घरातही आई, भावाला आणि बायकोला मारहाण केली आहे. वडिलांनाही त्याने बैठकीत सर्वांसमोर मारले होते. हे असे चाळे करणारे काही उपयोगाचे नाही. याला खरतर वेड्याच्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे. जाधवांनी जे वक्तव्य केले, त्यामुळे जनता चिडलेली आहे. तसेच शिवसैनिकही चिडलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. त्याला निवडणुकीतूनही बाद केले पाहिजे." असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...