आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष; पण ते असा भ्याड हल्ला करणार नाही - अंबादास दानवे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  'हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष; पण ते असा भ्याड हल्ला करणार नाहीत. हर्षवर्धन जाधव यांना स्टंटबाजी करून सहानुभूती मिळवण्याची सवय झाली आहे' असे म्हणत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. 
 

शिवसैनिकांनीच केला हल्ला - हर्षवर्धन जाधव 
दरम्यान माझ्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी माझी पत्नी आणि मुलगा दोघेच घरात होते. त्यामुळे मला हा हल्ला नामर्दासारखा वाटतो. असे हर्षवर्धन जाधव म्हणाले होते. यामुळे 'हर्षवर्धन जाधव यांना स्टंटबाजी करून सहानुभूती मिळवण्याची सवय झाली असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. 
 

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला, वाहनांची तोडफोड
कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरावर अज्ञातांनी हल्ला केला. काल मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी हर्षवर्धन यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान दगडफेक करताना आरोपींनी 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...