आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Harshvardhanji, Girish Mahajan Will Facilitate To You For Your BJP Entry ; Ashok Chavan

हर्षवर्धनजी, गिरीश महाजन तुमचा भाजप प्रवेश सुकर करतील - अशोक चव्हाण यांचा टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस नेते व इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभात मंगळवारी विधिमंडळातील सेंट्रल सभागृहात पार पडला. चार माजी व आजी मुख्यमंत्री यांच्या हजेरीत झालेल्या या शानदार समारंभात हर्षवर्धन यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर उपस्थितांनी जोरदार कोपरखळ्या मारत प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवले.


हर्षवर्धन तुम्ही लवकरच या सभागृहात येणार आहात. घाबरू नका, तुमचा भाजप प्रवेश गिरीश महाजन व्यवस्थित पार पाडतील, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात हर्षवर्धन यांच्यावर बाॅम्बच टाकला. 


देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले की ते करायचे ते करतातच, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. हर्षवर्धन यांचा भाजपप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत शिंदे यांनी त्याद्वारे दिले. हर्षवर्धन, तुमचा पाच वर्षांचा विश्राम कालावधी  नक्की संपेल, असा चिमटा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या कोपरखळ्यांना प्रतिकोपरखळ्या लगावल्या. हर्षवर्धन यांचे व्यक्तिमत्व लुभावणारे असे आहे. त्यांचे सर्व पक्षात मित्र आहेत. संंसदीय कार्यपद्धतीचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. हर्षवर्धन यांची उणीव गेली पाच वर्षे आम्हाला जाणवली, असे फडणवीस म्हणाले. 

 

तुमचे एक माजी मुख्यमंत्री तुम्हाला सभागृहात येण्याला शुभेच्छा देत आहेत, तर दुसरे पुस्तके लिहा म्हणतात. तुमचे नेमके काय ठरलंय, असे सवाल फडणवीस यांनी विचारला. व्यासपीठावर यावेळी दोन्ही सभागृहाचे सभागृनेते, विरोधी पक्षनेते, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. 


प्रकाशन समारंभाचे निमंत्रण द्यायला मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली. त्यामुळे माझ्या पुस्तकाला प्रकाशनापूर्वी मोठी प्रसिद्धी मिळाली, असे स्पष्ट करत भाजप प्रवेशाच्या चर्चेचा उगम हषवर्धन यांनी उलगडून दाखवला.


विनाेद तावडे माझे विश्वासू : मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांनी संसदीय कामकाज मंत्री मुख्यमंत्र्यांचा विश्वासू असतो, पण सध्याचे माहित नाही, असा चिमटा काढला.त्यावर मुख्यमंत्र्यांनी विनोद तावडे यांचे नाव घेताना माझे विश्वासू संसदीय मंत्री असा उल्लेख केला.

 

मी ५२ वर्षात सीट बदलली नाही : शरद पवार
काल माझ्या जीभ व गळ्यावर शस्त्रक्रिया झाली. तरी मी आज आवर्जून हजर राहिलो. मी आलो नसतो तर गिरिश महाजन यांच्याबरोबर मी अमित शहा यांना भेटायला गेलो, अशा बातम्या आल्या असत्या असे शरद पवार म्हणाले. तसेच ५२ वर्षाच्या कारकीर्दीत मी माझी सीट कधीच सोडली नाही, असे सांगून हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी चिमटाही घेतला.
 

बातम्या आणखी आहेत...