आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana Man Pushes His BMW Into River Because His Father Refusing To Buy New Jaguar Car

आई वडिलांनी जॅगूआर गाडी घेऊन दिली नाही, तर तरुणाने 2 महिन्यांपूर्वी खरेदी केली बीएमडब्ल्यू कालव्यात वाहून दिली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : हरियाणाच्या एका तरुणाने जॅगूआर किंवा फरारी खरेदी करण्याच्या जिद्दीमध्ये दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेली बीएमडब्ल्यू कालव्यात वाहून दिली. अपघात झाल्याची शंका येऊन लोक तिथे रेस्क्यू करण्यासाठी आले. तेव्हा तिथे एक तरुण आला आणि त्याने सांगितले की, मी माझी बीएमडब्ल्यू रिमोटने कालव्यात सोडली आहे. त्याच्यामध्ये कुणीही नाही. पोलिसांनी गोताखोर बोलावून संध्याकाळी उशिरा गाडी बाहेर काढली. 


झाले असे की, मुकारमपुरचा स्थायिक असलेल्या आकाशने 12 जूनला 45 लाख रुपयांमध्ये बीएमडब्ल्यू खरेदी केली होती. त्याला ती विकून जॅगूआर किंवा 80 लाखांची फरारी खरेदी करायची होती आणि त्यासाठी तो जिद्द करत होता पण त्याचे पिता यासाठी तयार नव्हते. त्यामुळे युवकाने हे पाऊल उचलले.  

व्हिडिओदेखील शेअर केला... 
तरुणाने रिमोटने कार कालव्यात पाडल्याचा व्हिडीओ बनवून कुटुंबियांसोबत शेअर केला. आकाशचा चुलत भाऊ ललितने सांगितले की, तो सकाळी काहीही सांगता घरातून बाहेर गेला होता. थोड्या वेळानंतर तो कालव्याजवळ असल्याची माहिती मिळाली. ललितने सांगितले की, आकाशला महागड्या कार चालवण्याचा शौक आहे. त्याने 12 जूनला फॉर्च्यूनर विकून बीएमडब्ल्यू खरेदी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...